Mumbai News: नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
माजी मंत्री, आमदार, खासदार, महाराष्ट्र प्रभारी यांचा या यादीत समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही यादी फायनल करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी पाठवण्यात आली आहे.
या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती,रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, मोहम्मद अझरुद्दीन, रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे,आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, भाई जगताप, अनिस अहमद,रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, प्रा. वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, डॉ. वजाहत मिर्झा, अतुल लोंढे,सिध्दार्थ हत्तिअंबीरे, हनुमंत पवार आदींचा यात समावेश आहे.
दोन दिवसापूर्वी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपाने 117 जागा जिंकल्या असून, 288 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस एकमकेांच्या विरोधात लढूनही चांगलं यश मिळवण्यात यशस्वी ठरले. 288 पैकी 207 जागी महायुतीचे नगराध्यक्ष विराजमान होणार आहेत. महाविकास आघाडीला केवळ 44 नगराध्यक्षपदं जिंकता आली. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे नागपूर विभागात 14 नगराध्यक्ष व 340 नगरसेवक, अमरावती विभागात 9 नगराध्यक्ष व 236 नगरसेवक, मराठवाड्यात 5 नगराध्यक्ष व 156 नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्रात 3 नगराध्यक्ष आणि 47 नगरसेवक, उत्तर महाराष्ट्रात 2 नगराध्यक्ष व 47 नगरसेवक आणि कोकण विभागात 1 नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक निवडणूक ले आहेत. यासोबत काँग्रेस समर्थक स्थानिक आघाड्यांचे 7 नगराध्यक्ष व 154 नगरसेवक निवडून आले आहेत.
काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर चोख उत्तर मिळाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.