Sanjay Raut, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाहीच..., संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Hindi Language Controversy : राज्य शासनाच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. यासाठी मनसेकडून विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मात्र, मनसेच्या याच भुमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त करत मनसेवर गंभीर आरोप केले.

Jagdish Patil

Mumbai News, 19 Apr : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकणं सक्तीचं करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून नवा वाद सुरू झाला आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार आता विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. यासाठी मनसेकडून विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मात्र, मनसेच्या याच भुमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त करत मनसेवर गंभीर आरोप केले.

संजय राऊतांनी मनसेचं (MNS) नाव न घेता मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी, हिंदीसह इतर भाषांचा वाद सुरू केल्याचा गंभीर आरोप केला. तर मनसेच्या आंदोलानानंतर राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, " हे सर्व ठरवून चाललं आहे.

महापालिकेच्या निवडणुकीआधी कोणता वाद निर्माण करता येईल, याबाबच 'कॅफे'मध्ये खल झाल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तर महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नव्हे तर गुजरातीपासून असल्याचा दावा केला. ते म्हणाले, "मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे.

संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचं सुरू आहे. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्यांच्यावर कोणीही काही बोलत नाही. हिंदी सक्ती शैक्षणिक धोरणापुरती मर्यादित आहे. परंतु हा वाद महापालिका निवडणुकीसाठी सुरू केला आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं संघाचे लोक सांगतात तेंव्हा हे का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मनसेवर निशाणा साधला.

तसंच यावेळी त्यांनी राज ठाकरे अमित शाह आणि नरेंद्र मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी कोणत्या भाषेत शहा-मोदींशी बोलते. ज्यांचे इंग्रजीचे वांदे आहेत, त्यांना हिंदीचा आधार घ्यावा लागतो, अशा शब्दात त्यांनी मनसे आणि भाजपवर हल्लोबोल केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT