Maharashtra Hindi controvercy : हिंदी भाषेच्या सक्तीचं समर्थन करत शिंदेंच्या नेत्याचा मनसेवर हल्लाबोल, म्हणाले, "मनसे नेत्यांची मुलं..."

Hindi mandatory in Maharashtra : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केलं आहे. तर विरोधकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 Apr : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केलं आहे. तर विरोधकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.

हिंदीच्या सक्तीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी या निर्णयाचे समर्थन केलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हिंदीमध्ये काहीही चूक नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, हिंदीमध्ये काहीही चूक नाही, मुलांना मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही. जे हिंदीला विरोध करत आहेत. ते इंग्रजीला मात्र विरोध करत नाहीत. हिंदीचा विरोध करणाऱ्यांची मुले इंग्रजीत शिकतात ते चुकीचं नाही, पण ते हिंदीला विरोध करतात.

Sanjay Nirupam
Beed Crime : वकील महिलेला मारहाण, काँग्रेस आक्रमक; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

इंग्रजी हा परदेशी विषय आहे तर हिंदी ही देशाची भाषा आहे त्यामुळे आपण ती शिकली पाहिजे., असं निरुपम यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही टीके केली, ते म्हणाले, "काही मनसे नेत्यांची मुले जर्मन आणि इंग्रजी शिकत आहेत. पण ते हिंदीला विरोध करतात."

Sanjay Nirupam
Jitendra Awhad : हिंदी राज्य भाषा की राष्ट्र भाषा? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत आव्हाडांनी सांगितला इतिहास

तसंच यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या एआय भाषणाच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे. तो वक्फला पाठिंबा देतो त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला असून बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात झाल्याचंही निरूपम म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com