Mumbai News : बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत चांगलेच भडकलेत.
उदय सामंत यांनी काँग्रेसला हा वाद सोडवायचा नाही, अशी टीका केली. मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
शिवसेनेचे (Shivsena) नेते उदय सामंत यांनी म्हटले की, "बेळगाव प्रकरणामागे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार आहे. काँग्रेसने हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. बेळगाव प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करू. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार आहोत".
बेळगावात पुन्हा एकदा मराठी भाषिकांना दडपशाहीला समोरं जाव लागतं आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा सोमवारी होत असून, त्याला कर्नाटकमधील काँग्रेस (Congress) राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापला आहे. या सीमावादाचे धक्के महाराष्ट्राला देखील बसू लागले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला सुनावलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कोल्हापुरातून शिवसेना कार्यकर्ते उद्या बेळगावकडे जाणार आहे. कर्नाटक पोलिसांकडून सीमेवरच अडवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाने सांगितले आहे. यावर महायुतीमधील शिवसेना नेते आक्रमक झाले आहे. उदय सामंत यांनी यावर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. मी किंवा माझे सहकारी बेळगावमध्ये जाणार असल्याचे सांगून उदय सामंत कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती 2006 पासून मराठी भाषिक मेळाव्याचे आयोजन करत असून, त्याला कर्नाटक सरकारकडून नेहमीच विरोध होत आला आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. याचवेळी कर्नाटक सरकारने बेळगावात विधिमंडळ अधिवेशन भरवले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढं करत, महाराष्ट्रातील नेत्यांना मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. परंतु महायुतीमधील शिवसेनेने बेळगावमध्ये जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमवारी बेळगावात काय घडणार, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.