Raut Vs Gulabrao Patil : ‘तुरुंगात जाऊन आलेला संत, रिकामटेकडा, बेरोजगार राजकारणी’; गुलाबरावांनी संजय राऊतांना धु धूतले...

Maharashtra Political News : संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे. तो सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाला आहे तो. त्याला तोच धंदा आहे, दहा वाजता भोंगा वाजवायचा, तीन वाजता भोंगा वाजवायचा.
Sanjay Raut-Gulabrao Patil
Sanjay Raut-Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 December : संजय राऊत हा तुरुंगात जाऊन आलेला संतच आहे ना. त्याची दररोज आरती केली पाहिजे. ईडीमध्ये गेलेला तो संत आहे. ईडीच्या जेलमध्ये जाणाऱ्या लोकांचा त्याला नेता केला पाहिजे. संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे. तो सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाला आहे तो. त्याला तोच धंदा आहे, दहा वाजता भोंगा वाजवायचा, तीन वाजता भोंगा वाजवायचा, अशा शब्दांत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना धु धूतले.

भाजपसोबत गेल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिनचिट मिळाली. आम्हाला भाजपकडून ऑफर होती, पण आम्ही गेलो नाही, त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकलं, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गुलाबराव यांनी संजय राऊतांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

संजय राऊत हा संतच आहे ना. तुरुंगात जाऊन आलेला संजय राऊत कोण आहे, संतच आहे ना तो. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना क्लिनचीट मिळाली आहे, त्याला हा मुद्दाच मिळाला आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांना टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांच्यावरही अशी कारवाई होणार होती, असं राऊत यांचं म्हणणं होतं. त्यावर गुलाबराव म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पायाची बरोबरी येणार नाही, संजय राऊतला. कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला वेडं केलं आहे. ते शिक म्हणावं बाबा, शिवसैनिक काय असतो ते?.

Sanjay Raut-Gulabrao Patil
Sharad Pawar Markadwadi Tour : पवारांच्या दौऱ्यात होणार ‘लाँग मार्च’चे प्लॅनिंग; राहुल गांधींसह केजरीवाल, बॅनर्जी, अखिलेश, ठाकरेही येणार?

महाविकास आघाडीच्या विधानसभा सदस्यांनी आमदारकीची शपथ न घेण्याच्या मुद्याचाही गुलाबरावांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आमदारकीची शपथ न घेणं हा बेशरपणा आहे. सुमारे चार लाख लोकांनी ह्यांना निवडून दिलं. लोकसभा निवडणुकीत संविधान दाखवून दाखवून त्यांनी शंभर सीट हिसकावल्या आणि ह्यांना लोकांनी निवडून दिल्यानंतर ते शपथ घेत नाहीत.

महाविकास आघाडीला बहुमत मिळालं नाही म्हणून हे बाहेर निघाले आहेत. बहुमत मिळण्यासाठी लाडक्या बहिणींचं भाऊ बनावं लागतं, एकनाथ शिंदेंसारखं कॉमन मॅन व्हावं लागतं. लोकांमध्ये फिरावं लागतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं राज्यभर फिरावं लागतं. शेतकरी, नोकरदार, तरुणांची कामं करावी लागतात. लोकल माणसांसारखं काम करावं लागतं. हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत, त्यांना काय माहिती आहेत, या गोष्टी. त्यांनी पाच वर्षे काम करावं आणि मग बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

Sanjay Raut-Gulabrao Patil
Markadwadi Voting : मारकडवाडीच्या ठिगणीचा देशभरात वणवा पेटणार, दिल्लीत अभ्यास सुरू; पटोलेंनी सांगितली अंदर की बात

नाना पटोले आणि उत्तम जानकर यांनी राजीनामा द्यावाच. कारण नाना पटोले हे तर अवघ्या पाचशे मतांनी निवडून आले आहेत. जेमतेम आले आहेत, लागली लॉटरी म्हणून ते निवडून आले आहेत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com