Raigad Politics Local Body Elections sarkarnama
मुंबई

Election Commission Update : विरोधक दिल्लीत, निवडणूक आयोग आजच महाराष्ट्रात करणार मोठी घोषणा; वेळ ठरली...

Maharashtra Local Body Election Dates Likely to Be Announced Today : एकीकडे विरोधकांकडून मतदारयाद्यांवर आक्रमक पवित्रा घेतला जात असताना राज्य निवडणूक आयोग मात्र ठरलेल्या वेळेतच निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Rajanand More

State Election Commission to Hold Press Conference : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी होणार, याबाबत सर्व राजकीय पक्षांसह मतदारांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण आता त्यासाठी फार वाट बघावी लागणार नाही. केवळ काही तासांतच राज्य निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मतदारयाद्यांमधील घोळांबाबत तक्रार करण्यासाठी विरोधी पक्षांतील नेते दिल्लीत दाखल झाले असतानाच राज्य निवडणूक आयोग आजच महाराष्ट्रात धमाका करणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील मतदारयाद्यांमधील त्रुटीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १ नोव्हेंबरला मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. त्याआधी दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. आता विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे ते तक्रार करणार आहेत.

एकीकडे विरोधकांकडून मतदारयाद्यांवर आक्रमक पवित्रा घेतला जात असताना राज्य निवडणूक आयोग मात्र ठरलेल्या वेळेतच निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान विरोधकांकडून देण्यात आले आहे. त्याला न जुमानता आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहे.

राज्यात तीन टप्प्यांत स्थानिच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपालिका व 42 नगरपंचायती, दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा व 336 पंयात समिती तर तिसऱ्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आज आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिकच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयोगाला त्याआधी सर्व निवडणुका घेऊन त्याचे निकालही जाहीर करावे लागणार आहेत. त्यामुळे आजपासून 31 जानेवारीपर्यंत राज्यात निवडणुकांचा धुराळा उडत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आयोगाने आज निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यास विरोधक काय भूमिका घेणार, हेही महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT