New Delhi : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याचवेळी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं पडघम पावसाळ्यानंतर वाजणार असल्याची चर्चा आहे. पण याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आणखी दोन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी 10 एप्रिलनंतर मंगळवारी (ता.१८) तारीख मिळाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी होणार होती.
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणी( Maharashtra Local Body Election) 'तारीख पे तारीख'चा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या नऊ महिन्यांपासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. अशातच आज होणारी सुनावणीही लांबणीवर पडली असून आता पुढची सुनावणी कधी? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेत बदल केले आहेत. पण शिंदे सरकारने सत्तेत येताच त्यात बदल न करता ती जैसे थी तसंच ठेवण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील 14 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
ओबीसी आरक्षण(OBC Reservation) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका याबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये असं सत्ताधारी आणि विरोधकांचं म्हणणं आहे. याचसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका निवडणुकी कधी होणार आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी महानगर पालिका, नगर परिषदांच्या मुदती संपल्या आहेत पण अद्याप निवडणूक जाहीर होण्याची चिन्हे दिसत नाही. आता पुन्हा तीन महिने या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.