Ajit Pawar News: विरोधी पक्षातून सरकारमध्ये आल्यानंतर काय फरक जाणवतो?; अजितदादांनी दोन वाक्यात सांगितलं...

Ajit Pawar Opposition Leader to Deputy CM: अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची दोनदा भेट घेतली
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Ncp Crisis News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सत्तेत सामिल झालेल्या अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह पक्षाध्यक्ष शरद पवारांची दोनदा भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी मंत्रालयात जाऊन बैठकही घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत भाष्य केलं. यावेळी माध्यमांनी अजितदादांना विरोधी पक्षातून सरकारमध्ये आल्यानंतर काय फरक जाणवतो? असा प्रश्न विचारला.

यावर अजितदादांनी दोन ओळीत उत्तर देत "मला काहीही फरक जाणवत नाही. मी विरोधी पक्षात असताना देखील काम करत होतो आणि सत्तेत असताना देखील कामं केली आणि आताही कामं करत आहे. लोकांचे प्रश्न सोडवत राज्याचा विकास करणं हेच आपलं कर्तव्य असून सरकारमधील एक घटक म्हणून आपण काम आहोत", असं अजित पवारांनी सांगितलं.

Ajit pawar
NCP MLA Meet Sharad Pawar: जयंत पाटील येईपर्यंत पवारांनी अजितदादांसह नऊ मंत्र्यांना ताटकळत ठेवले

"आज वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कारण काम होत नसेल तर होणार नाही म्हणून सांगायचं. आज देखील काही आमदारांचे काम कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे", असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Ajit pawar
Satara News : उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा; म्हणाले, कामे करता येत नसतील तर, विरोध तरी करु नका...

सध्या राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधी पक्षात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण या आधिच अजित पवार यांच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात अजून काही नव्या घडामोडी घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com