MMC Election Result Sarkarnama
मुंबई

MMC Election news : राज्यातील डॉक्टरांनी केला भाजपच्या पॅनलचा पराभव; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या भगिनी विजयी

Maharashtra Medical Council election : निवडणुकीत आयएमए एमएमसी पॅनल आणि ऑफिशियल आयएमए एमसीसी पॅनल या दोन पॅनलमध्ये मुख्य लढत होती. यातील ऑफिशियल आयएमए पॅनलसाठी भाजपने उघडपणे काम केले.

Rajanand More

BJP panel defeat : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची यंदाची निवडणूक राजकीय हस्तक्षेपामुळे चांगली गाजली. या निवडणुकीसाठी भाजपने एका पॅनलला उघडपणे पाठिंबा जाहीर करत मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक नेत्यांना कामाला लावले होते. भाजप पुरस्कृत पॅनलला मतदारांचा पाठिंबा मिळावा, पॅनलच्या बाजूने अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी नेत्यांनी मेहनत घेतली. मात्र, त्यानंतरही या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीसाठी २६ एप्रिलला मतदान झाले होते. तर २९ तारखेला मतमोजणी पार पडली. या निवडणुकीसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर राज्यभरातील सुमारे १ लाख ४० हजार मतदार होते. वैद्यकीय परिषदेतील नऊ सदस्यांची निवड ही राज्यातील नोंदणीकृत व नोंदणीचे नुतनीकरण केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत करण्यात येते.

निवडणुकीत आयएमए एमएमसी पॅनल आणि ऑफिशियल आयएमए एमसीसी पॅनल या दोन पॅनलमध्ये मुख्य लढत होती. यातील ऑफिशियल आयएमए पॅनलसाठी भाजपने उघडपणे काम केले. या पॅनलमधील उमेदवारांना विजयी करण्यासाठी मंत्री, आमदार, खासदारांकडून गाठीभेटीही घेण्यात आल्या. मात्र, मतदारांनी भाजपने पुरस्कृत पॅनलला धूळ चारली आहे.

निवडणुकीत आयएमए एमएमसी पॅनलचे नऊपैकी आठ उमेदवार विजयी झाले आहेत. या पॅनलच्या विजयासाठी राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अनेक माजी अध्यक्षांनी प्रयत्न केले. निवडणुकीतील राजकीय हस्तक्षेपावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याचेच पडसाद निवडणुकीत उमटल्याची चर्चा आहे. भाजप पुरस्कृत पॅनलला केवळ एकच जागा जिंकता आली आहे.

निवडणुकीतील विजयी उमेदवार -

संतोष अप्पासाहेब कदम, संजय साहेबराव कदम, निलेश वसंतराव निकम, संजय गणेशराव देशपांडे, सुनील माधवराव इंगळे, अनिलकुमार भास्कर पाटील, मंगेश मधुकर गुलवडे आणि अनिल शंकर पाचनेकर हे उमेदवार ‘आयएमए एमएमसी पॅनल’चे आहेत. तर उज्वला किशनराव कराड या भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्या माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या भगिनी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT