Priyanka Chaturvedi news : विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे; प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी…

Ambadas Danve MLC candidate : जेव्हा आमदारांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपदाला चिकटून न राहता ते सोडले आणि अधिकृत निवासस्थानही रिकामे केले, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLC election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर आता पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत आपली भावना मांडली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळालेल्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही एक पोस्ट केली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांना पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चतुर्वेदी यांचा पत्ता कट झाला. त्यावरून त्यांच्यासह आदित्य ठाकरेही नाराज झाल्याची चर्चा होती.

विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सुरूवातीपासून आघाडीवर होते. काँग्रेससह राष्ट्रवादीकडूनही ठाकरेंच्याच नावाला पसंती होती. मात्र, अचानक दानवेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यावर आता प्रियांका चतुर्वेदी यांनी पोस्ट केली आहे. पुन्हा एकदा पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी पदाला चिकटून न राहण्याची आपली भूमिका दाखवून दिली आहे.

Priyanka Chaturvedi
MLC Election update : मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंकडून दोन उमेदवारांची घोषणा

जेव्हा आमदारांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपदाला चिकटून न राहता ते सोडले आणि अधिकृत निवासस्थानही रिकामे केले. आज पुन्हा एकदा, सर्व पक्षांकडून महाविकास आघाडीच्या एकमेव विधानपरिषद सदस्यपदासाठी पाठिंबा असूनही, स्वतः उभे राहण्याऐवजी त्यांनी पक्षाचा बुलंद आवाज असलेल्या अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

Priyanka Chaturvedi
Keshav Upadhye news : भाजपच्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच केशव उपाध्ये मनातलं बोलले; म्हणाले, ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो...

सत्ता म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढवणे किंवा केवळ नेत्याचा दर्जा मिळवणे नव्हे; तर योग्य वेळी सत्ता इतरांकडे सोपवण्याची समज असणे होय, अशी भूमिका प्रियांका चतुर्वेदी यांनी मांडली. त्यांच्या या पोस्टवरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com