Mumbai News : एकीकडे नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने हुकमी अस्त्र बाहेर काढल्याचं बघायला मिळाले.
शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या. यामध्ये सध्या शिंदे गटात असणाऱ्या आमदारांसहित २३ जणांच्या सह्या आहेत. त्यामुळे ही अटेंडन्स शीट शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, '२१ जून रोजी सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला होता. या बैठकीला एकूण २३ आमदार उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरे यांना समर्थन देत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला उपस्थित आमदारांनी अनुमोदनही दिलं. सदर आमदारांनी अटेंडन्स शीट वर सह्या केल्या होत्या.'
वर्षावर झालेल्या बैठकीला आता शिंदे गटात असणारे आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे उपस्थित होते. दरम्यान, या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील शिंदे गटातील आमदारांना उलट तपासणीच्या दरम्यान प्रश्नांचा भडीमार करत कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.