Sachin Kalyanshetti : अक्कलकोटचा दीड वर्षांचा 'खड्डा' झटक्यात भरला; 45 कोटींचा निधी मंजूर

Akkalkot Road : महाविकास आघाडी सरकारमध्ये अक्कलकोट मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
Sachin Kalyanshetti, Akkalkot
Sachin Kalyanshetti, AkkalkotSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session : सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्वामी समर्थांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. या रस्त्याच्या कामासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पामध्ये अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता अक्कलकोट तालुक्यातल्या ग्रामीण भागातील जनतेची खड्डेमय रस्त्यातून लवकरच सुटका होणार आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र, मध्यतंरीच्या काळात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी करून देखील निधी उपलब्ध होत नव्हता. आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच अक्कलकोट तालुक्यातील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला.

Sachin Kalyanshetti, Akkalkot
Maratha Reservation : अंतरावली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही; काय सांगतो क्लोजर रिपोर्ट ?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून महाविकास आघाडी काळातील विकासाचा अनुशेष मागील दीड वर्षात भरून काढण्यात आला आहे. त्यानंतर आता तालुक्यातील 26 अत्यावशक रस्त्यांच्या सुधारणा करण्यासाठी देखील चालू हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात 45 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

Sachin Kalyanshetti, Akkalkot
Pimpri Chinchwad Fire : 7 निष्पाप महिला कामगारांचे बळी घेणारा कारखाना होता अनधिकृत

या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर

हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेला मंजूर निधीतून कुंभार वस्ती ते शेषगिरी या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी, सिंदखेड ते मोठ्याळ दीड कोटी, दुधनी ते नंदर्गी अडीच कोटी, हालहळळी अ.फाटा ते चपळगाववाडी तीन कोटी, राज्यमार्ग ते बऱ्हाणपूर व डोंबरजवळगे शाळा ते बोरेगाव अडीच कोटी, बोरेगाव ते दर्शनाळ दोन कोटी 20 लाख, दर्गा ते रेल्वे गेट व तोळणूरसाठी तीन कोटी, दोड्डी ते दर्गनहळ्ळीसाठी अडीच कोटी.

दर्गनहळ्ळी ते धोत्री एक कोटी 80 लाख, हैद्रा ते व्हसुर एक कोटी, चौदामैल ते गोगाव रस्त्यासाठी एक कोटी, गुरववाडी ते उडगी दोन कोटी, सलगर ते भिमपूर रस्त्यासाठी एक कोटी, सुलेरजवळगे ते करजगी रस्त्यासाठी दोन कोटी, मुस्ती ते हरणा तांडा एक कोटी, तांदुळवाडी ते वडजी दीड कोटी, हंद्राळ ते लालु तांडा एक कोटी, मैंदर्गी चौक ते मादनहिप्परगा दोन कोटी, आंदेवाडी खु.ते पानमंगरुळ रस्त्यासाठी एक कोटी.

Sachin Kalyanshetti, Akkalkot
Mla Disqualification Case : गुवाहाटीतील हॉटेलची बुकिंग एकनाथ शिंदे किंवा भाजपने केली होती का? योगेश कदमांचे बोलके उत्तर...

किणीवाडी ते नंदगांव एक कोटी, अक्कलकोट ते बणजगोळ रस्त्यासाठी एक कोटी, बासलेगाव ते गळोरगी एक कोटी, कोर्सेगाव ते कुमठे दीड कोटी,गौडगाव बु.पाणी टाकी आणि शावळ ते हिळ्ळी पर्यंतच्या रस्त्यासाठी साडेतीन कोटी, हालचिंचोळी ते वळसंग रस्त्यासाठी एक कोटी, बासलेगाव (फाटा) ते गळोरगी एक कोटी, असा निधी मंजूर झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) हे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे एक विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही फडणवीसांनी अक्कलकोटसाठी जलजीवन योजनेतून 42 गावांसाठी तब्बल 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तसेच यापूर्वी 368 कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानंतर आता अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे मत व्यक्त करत आमदार कल्याणशेट्टी यांनी आभार मानले.

(Edited by Sunil Dhumal)

Sachin Kalyanshetti, Akkalkot
Loksabha Election 2024 : परभणीत ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात भाजप लढणार? राष्ट्रवादी - शिंदे गट जागा सोडणार की...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com