Sunetra Pawar interacts with NCP leaders during candidate discussions for the Maharashtra MLC election, highlighting her key decision-making role. Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election : सुनेत्रा पवारांचा निर्णय झाला? विधान परिषदेसाठी 'या' सहा जणांपैकी एकाला लॉटरी लागणार...

NCP Vidhan Parishad Candidate : महायुतीच्या 9 जागांवर भाजपचे 6 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 उमेदवार विधान परिषदेवर पाठवला जाणार आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Jagdish Patil

Vidhan Parishad Election 2026 : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. या मतदानानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानपरिषदेवर कोणाची वर्णी लागणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांपैकी महायुतीच्या वाट्याला 9 जागा येणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी एक जागा येणार आहे.

महायुतीच्या 9 जागांवर भाजपचे 6 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 उमेदवार विधान परिषदेवर पाठवला जाणार आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

या जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे नेमकी संधी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. कारण अजित पवारांच्या निधनामुळे अशा पद्धतीचा पहिलाच निर्णय त्या घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी लागणार आहे.

अशातच आथा राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आणि चर्चेत असणाऱ्या उमेदवारांची नावे समोर आली आहेत. ज्यामध्ये अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, विक्रम संजय काकडे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन हे प्रफुल पटेलांचे कट्टर समर्थक आहेत. तर अनिकेत तटकरे हे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत. यासह पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून विधानसभेला पराभूत झालेले सुनील टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, आनंद परांजपे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार या नेमकं कोणाला विधानपरिषदेवर संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT