Girish Mahajan Controversy : वाहतूक कोंडीवरून मंत्री महाजनांना भिडणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ; अखेर पहिली तक्रार दाखल...

Worli Protest Girish Mahajan Controversy : संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभरात विरोधकांच्या निषेधासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यापैकी वरळीत महिलांच्या भव्य निषेध मोर्चा चांगलाच चर्चेत आला. त्याचं कारण म्हणजे या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
Mumbai Protest Traffic Jam | Girish Mahajan Row
A woman confronts minister Girish Mahajan during the Worli protest, while Zen Sadavarte later files a complaint over the incident.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Newsm 24 Apr : वरळीमध्ये भाजपच्या जन आक्रोश मोर्चादरम्यान एका महिलेने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीवरून चांगलंच धारेवर धरलं होतं. या महिलेच्या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.

मात्र, आता मंत्र्यांना आणि पोलिसांना जाब विचारणाऱ्या या महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभरात विरोधकांच्या निषेधासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यापैकी वरळीतील निषेध मोर्चा चांगलाच चर्चेत आला.

त्याचं कारण म्हणजे या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीला वैतागलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना, "रस्त्यावर या मोर्चामुळे ट्रॅफिक जॅम झालंय तुम्ही शेजारच्या मोकळ्या मैदानात का जात नाही?" असा प्रश्न विचारला. शिवाय यावेळी संतप्त महिलेने पोलिसांना देखील या वाहतूक कोडींबाबत जाब विचारला होता.

Mumbai Protest Traffic Jam | Girish Mahajan Row
Girish Mahajan: 'गेट आऊट फ्रॉम हेअर'! मुंबईकर महिलेनं गिरीश महाजनांना झाप झाप झापलं; भाजपनं ट्रॅफीक अडवून महिलांचा काढला होता मोर्चा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. विरोधकांसह अनेक लोकांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं. तर भाजपच्या समर्थकांकडून या महिलेला ट्रोल केलं जात आहे. अशातच आता सतत कोणत्यातरी कारणाने चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने या संबंधित महिलेविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग आणि चेंगराचेंगरीच्या उद्देशाने हिंसक कृत्य केल्या प्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार झेन सदावर्ते यांनी वरळी पोलिसांकडे केली आहे.

Mumbai Protest Traffic Jam | Girish Mahajan Row
BJP News: भाजपची मराठवाड्यात लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू,पण अशोक चव्हाणांच्या नांदेडबाबत घेतला धक्कादायक निर्णय

वकील झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "त्या मोर्चा दरम्यान बंदोबस्तात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायला ही महिला कोण आहे?" असा सवाल उपस्थित करत झेन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com