

Nanded Politics News : आगामी 2029 च्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भारतीय जनता पार्टी आतापासूनच लागली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपने 74 जिल्हा प्रभारींच्या नियुक्ती केली आहे. यामध्ये अनेक विद्यमान लोकप्रतिनिधी व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
मात्र, भाजपचे सर्वाधिक आमदार असलेल्या नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदारावर जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली नाही. एका अर्थाने या नियुक्त्यांमधून नांदेडच्या आमदारांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बेदखल केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
भाजपने मंगळवारी (ता.21) आपल्या राज्यातील जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात या नव्या संरचनेत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. परंतु सर्वाधिक पाच आमदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात भाजपने एकाही आमदारावर जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये घवघवीत यश मिळवले. असे असताना जिल्हा प्रभारी नेमताना नांदेड जिल्ह्यातील आमदारांना बेदखल का करण्यात आले? असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
माजी आमदार राम पाटील रातोळीकर, गंगाधर जोशी, डॉ. माधव उच्चेकर, प्रवीण साले आदींनी वर्षानुवर्ष नांदेडमध्ये संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिले होते. अशा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही प्रदेशाध्यक्षांनी संधी दिली नाही. उलट जिल्ह्याबाहेरील भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना नांदेड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केले.
नांदेड उत्तरसाठी किरण पाटील तर नांदेड दक्षिणसाठी रेखा कुलकर्णी या जिल्ह्याबाहेरील नेत्यांवर प्रभारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे. एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रभारी देताना प्रदेशाध्यक्षांनी नेमका काय निकष लावला? यावर आता स्थानिक पातळीवर खल सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.