MLC Election: राज्यात विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. आजपासून यासाठी उमेदवारी अर्ज देखील भरायला सुरुवात झाली आहे, दरम्यान, तीन जागांवर महायुतीमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. या तीन जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या असून या जागांवर भाजपचा डोळा आहे. या जागांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच माहिती दिली, त्यानंतर भाजपचे नेते कामाला लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, "आमची यासंदर्भात चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेबाबत चर्चा सुरु आहे तर राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरु आहे. आम्ही एकत्र बसून यातून मार्ग काढू, सध्या यावर मार्ग निघालेला नाही पण आम्ही मार्ग काढू"
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन भाजपचा नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील प्रत्येकी एका जागेवर आपला उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. या जागांवर विद्यमान आमदार हे भाजपचे नाहीत, पण तरीही या महापालिकांमध्ये आपले चांगले नगरसेवक निवडून आल्यानं आणि संबंधित ठिकाणी पक्षाची ताकद वाढलेली असल्यानं या जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपची धडपड सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे, पण वरिष्ठ पातळीवर अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.
पण फडणवीसांनी या तीन जागांबाबत चर्चा सुरु असल्यानं आणि लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं आता भाजपचे डझनभर नेते आणि कार्यकर्ते उत्साहात असून भाजपचे उमेदवार निवडून आणण्याासठी हे नेते आता कामाला लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.