Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session : बंडानंतर अधिवेशनात दोन्ही पवार गट आमने-सामने; आता भुजबळ, मुंडे गाणार सरकारचे गुणगान

सरकारनामा ब्यूरो

NCP Crisis And Monsoon Session : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर अर्थसंकल्प, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आदी मुद्द्यांवरून सडकून टीका केली होती. यात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी नेते आघाडीवर होते. आता मात्र हेच नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात पक्षातील बंडखोर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि शरद पवार यांचा गट आमने-सामने येणार आहे. काही दिवसांपूर्वी एकत्र असलेल्या या गटांकडून शिंदे-फडणवीस सरकावर सडकून टीका केली जात होती. तसेच तत्कालीन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनातही सरकारला 'सळो की पळो' करून सोडले होते. आता मात्र हेच आमदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतील. तर उपमुख्यमंत्री बनलेले पवार आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे-फडणवीस सरकारचे गोडवे गाताना दिसणार आहेत.

दरम्यान, अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ठिणगी पडली आहे. शरद पवार गटाचे विधानसभेतील प्रतोद यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. त्यात मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या आमदारांना वगळून इतर आमदारांची विरोधी बाकावर बसण्याची सोय करण्याची मागणी केली. यावरून अजित पवार यांनीही आव्हाड यांना सडतोड उत्तर दिले आहे. पवार यांनी घोडा मैदान लांब नसून अधिवेशनात सर्व चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत शरद पवार गटाला एक प्रकारचा इशारा दिला आहे.

बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ४० तर शरद पवार गटाकडे १९ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याची अधिकृतपणे यादी अद्याप जाहीर केलेली नाही. दरम्यान,अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाकडून आज सोमवारी (ता. १७) पुन्हा शक्ती प्रदर्शन होणार आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांची ताकद लवकरच स्पष्ट होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या आमदारांना अजित पवार गटाचा 'व्हिप' बजावून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT