Manoj Saunik, Sujata Saunik Sarkarnama
मुंबई

Maharashtra Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी नवरा-बायकोत कॉम्पिटिशन; रेसमध्ये तिसरा अधिकारीही, जोरदार लॉबिंग सुरू

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Government Latest News : राज्यातील सर्वांत मोठे प्रशासकीय पद म्हणजे मुख्य सचिवपद असते. त्यातही महाराष्ट्रासारख्या देशातील आघाडीवर असलेल्या राज्याच्या मुख्य सचिवपदावर काम करण्यासाठी संधी मिळणे, ही विशेष बाब आहे. यातही विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदासाठी पती-पत्नीतच स्पर्धा रंगली आहे. पण तिसऱ्या नावाचीही चर्चा आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. मात्र, मनोज सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यांना कार्यकाळ वाढवून न मिळाल्यास राज्याच्या मुख्य सचिवपदी त्यांची पत्नी सुजाता सौनिक या पदभार स्वीकारतील. आता मुख्य सचिवपदाची रेस कोण जिंकणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

मनोज सौनिक यांची कारकीर्द

मनोज सौनिक हे मूळचे बिहारचे असून ते महाराष्ट्र केडर 1987 च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रात जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. मग 1993 मध्ये रायगड झेडपीचे सीईओ, 1995 मध्ये पुणे झेडपीचे सीईओ झाले. नंतर नाशिक, धुळ्याचे जिल्हाधिकारी पद सांभाळले. सुशीलकुमार शिंदे यांचे खासगी सविचही होते. प्रधान सचिव वाहतूक-बंदर, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, त्यानंतर 30 एप्रिल 2023 ला ते महाराष्ट्रचे मुख्य सचिव झाले.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज सौनिक यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते. याचा प्रस्ताव राज्याने केंद्र सरकारला सादर केला आहे. यावर या आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण मनोज सौनिक यांना कार्यकाळ वाढवून न मिळाल्यास सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाची सूत्रे दिली जातील, असे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्पर्धेत तिसऱ्या अधिकाऱ्याचे नाव

दुसरीकडे, मनोज सौनिक यांना मुदवाढ देण्यास काही मंत्र्यांचा विरोध आहे. तसेच सौनिक पती-पत्नी ऐवजी मुख्य सचिवपद आयएएस नितीन करीर यांना द्यावे, अशी मागणीही होत असल्याची असल्याची चर्चा आहे. पण नितीन करीर हे मुख्य सचिव झाले तरी ते येत्या मार्चमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्यानतर सुजाता सौनिक या मुख्य सचिव होतील, अशी शक्यता आहे. पण सुजाता सौनिकही येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होणार आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने मनोज सौनिक यांचा कार्यकाळ ६ महिन्यांनी वाढवल्यास सुजाता सौनिक आणि नितीन करीर हे दोघेही मुख्य सचिव होऊ शकणार नाहीत. म्हणूनच मनोज सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्यास विरोध केला जात आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT