KDMC Commissioner News : कंत्राटी चालकाने केला आयुक्तांचा पाठलाग; चौकशी करत घेतले फैलावर...

Contract Driver Commissioner Chased Car : महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी संबंधित विभागास 'त्या' चालकावर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
Dr. Indurani Jakhad
Dr. Indurani JakhadSarkarnama
Published on
Updated on

Dombiwli News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड या प्रभागात पाहणी दौरा करत असताना, एका कंत्राटी चालकाने त्यांच्या गाडीचा पाठलाग केल्याचे पुढे आले आहे. एक व्यक्ती पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवून त्याची चौकशी करत त्याला चांगलेच फैलावर घेतले. (Kalyan Dombiwli Municipal Commissioner chased by contract driver)

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी संबंधित विभागास 'त्या' चालकावर कारवाई करावी, असा आदेश दिला आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. कंत्राटी चालक धर्मेंद्र सोनावणे याची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महापालिका उपायुक्तांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Indurani Jakhad
Solapur DCC : मृत संचालकांच्या वारसांनाही पाठविली दोषारोपपत्रे; वारसांनी मागितली मुदतवाढ

महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभागांत पाहणी दौरा केला. इंदुराणी जाखड या केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा करत होत्या. दरम्यान, त्यांच्या गाडीचा कंत्राटी चालक धर्मेंद्र सोनावणे हा दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होता. आयुक्त जाखड यांच्या ध्यानात ही गोष्ट आली.

इंदुराणी जाखड यांनी तातडीने गाडी बाजूला घेऊन सोनवणे याला थांबवले. त्याच्या गळ्यातील आयकार्ड पाहिले. त्यावेळी तो कल्याण-डोंबिवली महापालिकेचा त्यांच्याच गाडीचा कंत्राटी चालक निघाला. त्यावेळी त्यांनी सोनावणे याच्याकडे पाठलाग करण्याचे कारण विचारले. त्यानंतर त्याला सर्वांसमोर चांगलेच सुनावले. शेवटी संबंधित विभागाला सोनावणे याच्यावर करण्याची सूचना केली.

Dr. Indurani Jakhad
Operation Lotus : ‘कर्नाटकातही शिंदे, पवार...’; मोदी भेटीनंतर कुमारस्वामींचा ‘ऑपरेशन लोट्‌स’चा दावा

या पाठलाग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन सोनावणे याच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंत्राटी चालक सोनावणे हा आयुक्तांचा पाठलाग का करत होता? हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी आयुक्त कोणत्या विभागात जातात, काय पाहणी करतात, हे काम त्याला कोणाकडून सांगण्यात आले होते का? हे काम त्याला कोणी सांगितले? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Dr. Indurani Jakhad
Loksabha Election 2024 : माजी पंतप्रधानांच्या पक्षाला भाजपने सोडल्या फक्त चार जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com