Anjali Damania, Amol Mitkari Sarkarnama
मुंबई

Anjali Damania : 'स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला...'; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती होताच अजितदादांच्या आमदाराची बोचरी टीका

Anish Damania MITRA advisor : देशात आणि राज्यात कोणतीही भ्रष्टाचाराची घटना घडल्यावर त्यावर आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या 'मित्रा' या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 16 Sep : देशात आणि राज्यात कोणतीही भ्रष्टाचाराची घटना घडल्यावर त्यावर आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या 'मित्रा' या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिश दमानिया यांची 'मित्रा' संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती होताच अंजली दमानिया यांच्यावर काही राजकीय पक्षांनी टीका करायला सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच मुद्द्यावरून अंजली दमानियांवर जहरी टीका केली आहे.

एक्सवर पोस्ट करत अमोल मिटकरी यांनी दमानिया यांच्यावर टीका केली आहे. 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली. यावेळी एका स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप, आगपाखड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या सल्लागारपदी आणून ठेवले आहे', अशी बोचरी टीका मिटकरींनी केली आहे.

अंजली दमानिया सतत राजकीय नेत्यांची भ्रष्टाचारी प्रकरण बाहेर काढत असतात. त्यांनी पाठपुरवठा केल्यामुळे आतापर्यंत अनेक मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागली. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांचा समावेश आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी देखील दमानिया यांच्यामुळेच वाढल्या होत्या.

रोहित पवारांची पोस्ट

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अनिश दमानिया यांच्या नियुक्तीबाबत एक्सवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’ या संस्थेवर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन.

एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.'

अंजली दमानिया यांचं स्पष्टीकरण

रोहित पवारांच्या पोस्टवर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं की, रोहित पवार यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचल्यावर मला तितकस वाईट वाटलं नाही. हे तर अपेक्षित होते. अनिश, हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो 'एफआयसीसीआय'चा सभासद झाला. म्हणून त्याला 'मित्रा'वर मानद सल्लागार म्हणून घेतले आहे.

या पदावर काम केल्याबद्दल तो मानधन घेणार नाही. त्याला ना राजकारणाशी घेणे देणे आहे, ना सरकारशी. माझ्यासारखेच त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचे आहे. हे वृत्त त्याने आणि मी आपआपल्या समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT