Anish Damania News : अंजली दमानिया यांच्या पतीची नियुक्ती झालेल्या 'थिंक टँक'चे नेमके काम काय? फडणवीस आहेत अध्यक्ष...

What is the Role of Mitra Think Tank: सरकारच्या विविध विभागांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे, विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, नागरी समाज, विविध गैर-सरकारी संस्था तसेच खाजगी व्यावसायिक संघटनांमध्ये संवाद घडवून आणण्याची जबाबदारी 'मित्रा'वर आहे.
"Anish Damania appointed to Mitra think tank, chaired by Maharashtra CM Devendra Fadnavis."
"Anish Damania appointed to Mitra think tank, chaired by Maharashtra CM Devendra Fadnavis."Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis as Chairman of Mitra : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या ‘मित्रा’ या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रा म्हणजेच महाराष्ट्र परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे ही संस्था खूप महत्वाची मानली जाते.

अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने सरकारमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काही मंत्र्यांना आपली पदं गमवावी लागली. इतर सामाजिक प्रश्नांवरही त्या सक्रीय असतात. आता त्यांचे पती अनिश दमानिया हेही ‘मित्रा’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

मित्रा संस्थेचे नेमके काम काय?

राज्याच्या गरजा लक्षात घेऊन खाजगी क्षेत्र आणि गैर-सरकारी संस्थांच्या सहभागाद्वारे नीती आयोगाच्या धोरणाच्या धर्तीवर राज्याचा जलद आणि व्यापक विकास साध्य करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा प्रदान करण्यासाठी एक थिंक टँक म्हणून ही संस्था काम करते.

"Anish Damania appointed to Mitra think tank, chaired by Maharashtra CM Devendra Fadnavis."
Anajali Damania News : मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर घाव घालणाऱ्या अंजली दमानियांचे पती सरकारच्या ‘थिंक टँक’मध्ये; रोहित पवारांकडून ‘खास’ शुभेच्छा...

सरकारच्या विविध विभागांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे, विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, नागरी समाज, विविध गैर-सरकारी संस्था तसेच खाजगी व्यावसायिक संघटनांमध्ये संवाद घडवून आणणे आणि विकासाचे नवीन उपाय सुचवणे, कमी प्रगती असलेल्या आकांक्षी तालुके/शहरे कार्यक्रमासारख्या योजना, कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि त्यांच्या प्रगतीचा नियतकालिक आढावा घेण्याची जबाबदारीही या संस्थेवर आहे.

कृषी आणि संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कौशल्य विकास नवोन्मेष, शहरीकरण, बांधकाम क्षेत्र विकास आणि जमीन प्रशासन, वित्त, पर्यटन, क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल, उद्योग आणि लघु उद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा आणि दळणवळण या 10 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे, याव्यतिरिक्त, पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष देऊन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे काम संस्था करते.

"Anish Damania appointed to Mitra think tank, chaired by Maharashtra CM Devendra Fadnavis."
Supreme Court on SIR : सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला मोठा झटका देणार? SIR बाबत दिला गंभीर इशारा...

ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज - आयओटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, जीआयएस आणि ब्लॉकचेन वापर या क्षेत्रांमध्ये प्रशासनाला पूरक असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचविण्याची जबाबदारीही या थिंक टँकवर सोपविण्यात आली आहे. जागतिक बँक, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि सीएसआर ट्रस्ट फंडांकडून विकास उपक्रमांसाठी अर्थसंकल्पाबाहेरील संसाधने उभारण्यासाठी सरकारला सूचना करण्यासाठी ‘मित्रा’ची भूमिका महत्वाची आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com