Eknath shinde rally Teaser : माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्या (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होत आहे.
त्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिंरजीव आमदार योगेश कदम यांनी या सभेचा टीझर पोस्ट केला आहे.
रामदास कदम यांनी खेड परिसरात बॅनरबाजी करीत ठाकरे गटाला डिवचलं आहे. "करारा जवाब मिलेगा", "विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ," अशा आशयाचे बॅनर रामदास कदम यांनी लावले आहेत.
५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. खेडमधील गोळीबार मैदानातही विराट जाहीर सभा झाली होती. आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभा होत आहे. शिंदे गटाकडून यासभेची जोरदार तयारीसुरू असून ठाकरेंच्या आरोपाला ते कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. ठाकरेंची गोळीबार मैदानात सभा झाली होती, याच मैदानात मुख्यमंत्र्यांनी सभा होत आहे. रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. गोळीबार मैदानात सभेची तयारी अंतिम टप्यात आहे. गोळीबार मैदानात गर्दी जमविण्यासाठी कदम पिता-पुत्र कामाला लागले आहेत.
रामदास कदम यांनी मागील काळात उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. आपला मुलगा योगेशला राजकारणातून संपवण्याचा कट आखला जात असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे आता सभेकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी खेडमधल्या सभेत मोदींच्या नावावर निवडणुका लढवून दाखवा असं आव्हान शिंदे गटाला दिलं. शिंदे गट मतांसाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव वापरतात, पण शिवसेना नाव बाजूला ठेवा, तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि पक्ष बांधून दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.