Devendra Fadnavis: महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असल्याचं आपल्याला दररोज कुठे ना कुठे घडणाऱ्या गंभीर घटनांमधून दिसते आहे. एकतर यासाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही किंवा मग गृहमंत्र्यांचं पोलिसांवर नियंत्रण नाही, असे अनेक प्रश्न यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत. पण आता यालाच पुष्टी देणारी माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं (NCRB) याची नोंद केली आहे. याची कबुली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सन २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये बालकांवरील अत्याचारांमध्ये ४८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये एकूणच महिलांच्या अत्याचारात देखील वाढ झाली असून याबाबत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापुर परिक्षेत्रात २०४५-२५ मध्ये महिलांवरील २३६२ अत्याचारांच्या घटना तर ४४८५ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २०२२-२५ या चार वर्षांच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या ६४१ घटना घडल्या असून तसंच या वर्षात जानेवारी ते २० मार्च २०२६ पर्यंत ४१ घटना घडल्या आहेत. ही सर्व आकडेवारी धक्कादायक आकडेवारी आहे.
दरम्यान, ही आकडेवारी देताना महाराष्ट्र हा महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये क्रमांक दोनवर असून हे गुन्हेगारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, याची एकाअर्थी कबुलीच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.