sharad pawar, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

शिंदे सरकारला सळो की पळो करणारा नेता शरद पवार ठरविणार !

विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकरांची निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. "सभागृहाचे कामकाज करताना नियमांचे पालन व्हावे, याबाबत त्यांनी लक्ष देऊन सूचना द्याव्यात. या सूचना सर्व सदस्यांनी पाळाव्यात," अशी अपेक्षा जयंत पाटलांनी व्यक्त केली. (sharad pawar news)

"सदस्यांनीही सभागृहाचा मान राखून नियमांनुसारच वर्तन करावे. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे," अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. त्यावर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "राष्ट्रवादी कॉग्रेसचाच विरोधीपक्ष नेता होणार आहे. याबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यासोबत बैठक आहे," ते माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, "शिवसेनेचे ३९ सदस्य हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने सदस्य संख्या कमी झाली आहे. राष्ट्रवादीकडे अधिक सदस्य आहेत. आज शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत विरोधीपक्ष नेते पदाबाबत चर्चा होणार आहे. अनुभवी विरोधीपक्ष नेता असावा, असा निर्णय पवारसाहेब घेतील. विरोधी पक्ष नेता आमचा असला तरीही महाविकास आघाडी सोबत आमचे काम असेल,"

विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवार कुणाच्या नावाला पसंती देणार हे सांयकाळी समजेल.

फडणवीसांची कारकीर्द गाजली

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची अडीच वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली. मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे प्रकरण, पेन ड्राईव्ह बॉम्ब, अनिल देशमुखांसह नवाब मलिक प्रकरण यांसह अनेक मुद्दांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारी पिसे काढली. त्यामुळे आता नव्या सरकारलाही सळो की पळो करणारा नेताच पुढील विरोधी पक्षनेता असणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT