एकनाथजी, नार्वेकरांना आपलसं करुन घ्या, नाहीतर तुमचं काही खरं नाही !

राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास हा शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप असा आहे.
Rahul Narvekar, Eknath Shinde, Ajit Pawar
Rahul Narvekar, Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचे सभागृहातील विविध पक्ष्याच्या नेत्यांनी अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्किलपणे फटकेबाजी केली. पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला. (Ajit Pawar latest news)

राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास हा शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप असा आहे. यावर भाष्य करताना नार्वेकरांनी नेतृत्व कौशल्याविषयी अजित पवारांनी कौतुक केलं. अजित पवार म्हणाले, "नार्वेकर शिवसेनेत असताना आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते, तेव्हापासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. ते राष्ट्रवादीत असताना ते माझ्या जवळचे सहकारी होते, आता ते भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. ते ज्या ज्या पक्षात होते, तेथे ते पक्षनेतृत्वाच्या अगदी जवळ होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना लवकर आपल्या जवळचे करुन घ्यावे, नाहीतर त्यांचं काही खरं नाही,"

Rahul Narvekar, Eknath Shinde, Ajit Pawar
जावायाला आमचा हट्ट पुरवावा लागणार ; अजितदादांचा नार्वेकरांना चिमटा

"नार्वेकरांनी सगळ्या पक्षात उत्तम काम केले आहे. पक्ष नेतृत्वा जवळ जाण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. सर्वात तरुण अध्यक्ष हा त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे, पण तेवढीच जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रवादीत असताना त्यांना आम्ही मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती,पण त्यावेळी मोदींच्या लाटेत त्यांचा पराभव झाला," अशा अनेक आठवणींना अजित पवारांनी उजाळा दिला.

"नार्वेकरांकडून सर्वांना न्याय मिळेल,अशी अपेक्षा आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाची चाके अधिक गतीमान होतील. आपण अभ्यासू असल्याचे त्यांचा प्रभाव विधीमंडळाच्या कामावर असेल. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांना सव्वा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी उत्तमपणे काम केले. यापूर्वीच्या अध्यक्षांनी सभासदांना न्याय देण्याचे काम केले आहे, हेच काम तुम्ही पार पाडाल, ही अपेक्षा आहे."

आमचा हट्ट पुरवावा लागेल

नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले, " नार्वेकर अभ्यासू , कायद्याचे जाण असलेले अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. ते रामराजे निंबाळकर यांचे जावई असल्यानेही आमचेही जावई आहेत, विधीमंडळात जावई-सासऱ्याचे वर्चस्व आहे.पण जावायाला आमचा हट्ट पुरवावा लागेल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com