Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar sarkarnama
मुंबई

Padalkar Awhad Clash : "गाडीत हत्यारं, आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती..."; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Sanjay Raut alleges murder plot in Padalkar-Awhad clash : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी काल विधानभवनाच्या आवारातच एकमेकांना मारहाण केली. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 18 Jul : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी काल विधानभवनाच्या आवारातच एकमेकांना मारहाण केली.

या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय विरोधकांनी देखील या प्रकरणी पडळकरांच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या मारहाणी संदर्भात एक खळबळ जनक दावा केला आहे.

कालच्या मकोकाच्या आरोपींच्या गाडीत हत्यारे होती आणि त्यांचा जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, असा दावा त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, हनी ट्रॅप, आमदार निवासमध्ये असणारी टॉवेल गँगवर कारवाई होत नाही. मोक्काचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदच्या हस्तक पक्षात, विधिमंडळात घेतले जात आहेत.

हीच या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला. आता जे राज्यात सुरू त्याला सर्वस्वी भाजप जबाबदार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीवर भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत काल गँगवॉर झालं.

खुनाचे आणि मोक्काचे आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये होते. त्यांना तिथे कोणी आणलं त्यांच्यावर काय कारवाई झाली का? असा सवाल करत कालची घटना घडल्यावर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान, कालची घटना असो वा आणखी काही घटनांवरून सरकारला कोणीही जाब विचारायला नको म्हणून त्यांना विरोधी पक्षनेता नको आहे.

गुंडांच्या टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या आहेत. आता हे गुंड विधानसभेच्या दारा बाहेर आले आहेत, काल फक्त चाकू सुरे आणि हत्यारे बाहेर काढायची गरज होती. शिवाय काल या गुंडांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारे होती, त्यांचा जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट होता अशी माझी पक्की माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT