Shashikant Shinde | Narendra Patil Sarkarnama
मुंबई

Shashikant Shinde And Narendra Patil : 25 वर्षांपासूनचा संघर्ष, आता क्षणात पूर्णविराम; असं काय घडलं?

Shashikant Shinde and Narendra Patil Political Rivalry End : गेल्या 25 वर्षांपासून आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील संघर्षाला पूर्वविराम मिळाला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला कामगार क्षेत्र व राजकारणामध्येही विशेष महत्त्व आहे. या संघटनेतील प्रमुख दोन नेते, आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील संघर्ष, सर्वश्रुत असाच!

गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या या सुप्त संघर्षाला आता पूर्णविराम देण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा 22 जानेवारीला वाढदिवसानिमित्तानं हे दोन्ही नेते नवी मुंबईत एकत्र आले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी व्यासपीठावरून गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या मतभेदाला तिलांजली देण्याचा निर्धार केला.

शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील, हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असतानाही हा संघर्ष सुरू झाला होता. नरेंद्र पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर या संघर्षाला पक्षीय वळण मिळाले. 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचार करताना दिसले. यातून दोन्ही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. या भांडणामध्ये माथाडी संघटना व कामगारांचेही नुकसान होऊ लागले होते. आपसांतील भांडणामुळे तीन संघटनेचे व कामगारांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा तो जाहीर देखील केला.

माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) व नरेंद्र पाटील यांनी पक्ष व वैचारीक मतभेद बाजूला ठेवून कामगार हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला कामगार क्षेत्र व राजकारणामध्येही विशेष महत्त्व आहे. परंतु जवळपास 25 वर्षापासून संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होते, कधी उघड, तर कधी छुप्यापद्धतीने दोघांमध्ये संघर्ष होत होता. आता हा राजकीय संघर्ष थांबवण्याचे जाहीर करताच, कामगारांमध्ये उत्साहात वातावरण पसरले आहे.

माथाडी चळवळ आमची ताकद...

नरेंद्र पाटील यांचा 22 जानेवारीला वाढदिवस होता. यानिमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठ होते. यानिमित्ताने दोन्ही नेत्यांनी मतभेदाला तिलांजली देण्याचा निर्धार केला. 25 वर्षांपासून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाला पूर्णविराम देण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याबाबत आमदार शशिंकार शिंदे म्हणाले, "माथाडी चळवळ हीच आमची ताकद आहे. नरेंद्र पाटील व आमच्यामध्ये मतभेद होते. आता आमच्यातील मतभेद संपलेत. दोघांचे पक्ष वेगळे असले, तरी यापुढे संघटना व कामगार हेच केंद्रबिंदू मानून एकमताने काम करत राहणार आहोत".

संघटना एकसंघ राहावी, यासाठी हट्ट...

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी संघटनेत काम करताना शशिकांत शिंदे व आमचे अनेकदा मतभेद झाले. या वैचारिक संघर्षामध्ये पोपटराव देशमुख यांच्यासारखे सहकाऱ्यांनी शांत राहत संघटना एकसंघ ठेवली. ही संघटना एकसंघ राहावी, यासाठी हट्ट धरायचे. तशी कामे देखील केली आणि करून घेतली. आता संघटनेसाठी मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने आम्ही एक झालो आहोत. संघटनेसाठी आपापल्या परीने काम करत राहणार आहोत, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT