Sharad Pawar : ठाकरेंच्या शिलेदारांवर विश्वास, शरद पवारांनी उदय सामंतांना फटकारलं; म्हणाले, 'फोडाफोडीसाठी दावोसला...'

DCM Eknath Shinde ShivSena Uday Samant Sharad Pawar ShivSenaUBT party MP and MLA Ratnagiri : शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासदार-आमदार फुटणार नाही, असा विश्वास कोल्हापूर इथल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Sharad Pawar 2
Sharad Pawar 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार-आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा आज रत्नागिरीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या दावा केला. यावर शरद पवार यांनी फटकारलं असून, उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांवर विश्वास व्यक्त केला आहे.

"उद्धव ठाकरेंशी शिवसेना सोडून खासदार-आमदार जातील, असे वाटत नाही. वाटेल ते त्याग करतील, मात्र बाळासाहेबांची विचारधारा कधी सोडणार नाहीत", असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी कोल्हापूर इथं पत्रकारांशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या आजच्या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील खासदार-आमदार आणि पदाधिकारी प्रवेश करणार असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar 2
Sanjay Raut : तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लवकरच मिळतोय; संजय राऊत यांचा मोठा दावा

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यासोबत असणार आहेत. एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सहाजिक आपला पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे 'दावोस'मध्ये बसून बोलताना पाहिले. परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ते 'दावोस'ला गेले होते की, फोडाफोडी करायला 'दावोस'ला गेले होते हे मला कळत नाही". उदय सामंत यांनी 'दावोस'मध्ये जाऊन केलेली वक्तव्य मुख्यमंत्र्यांचा जो उद्देश होता, त्याची सुसंगत नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar 2
Dinvishesh 24 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

'काही खासदारांचे फोटो मी पाहिले आहेत. पण ते उद्धव ठाकरे यांची सेना सोडून शिंदेंकडे जातील, असं वाटत नाही. वाटेल ते त्याग करतील मात्र बाळासाहेबांची विचारधारा कधी सोडणार नाहीत', असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

ठाकरेंच्या सभांना जास्त गर्दी...

'उद्धव ठाकरे हे सतत सांगत असतात, भाजपचे हिंदुत्व खरं नव्हे, ते पुन्हा एकदा त्यांनी काल सांगितलं. ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंची देखील काल सभा झाली. कार्यक्रम घेतला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपला अधिकार आहे असं दोघांनाही वाटतं. त्याची प्रचिती काल आपण पाहिली लोकांची उपस्थिती पाहिली, तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी होती', असेही शरद पवार यांनी म्हटले.

ठाकरेंच्या बळाचं नाऱ्यावर भाष्य...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्वबळानं जायाचं, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. यावर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी याच्या आधी देखील स्वबळाबाबत मत मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मला भेटायला आले होते. यावर आमची सविस्तर चर्चा झाली. काल उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले हे त्यांचे मत आहे. पण याबाबत खूप टोकाची भूमिका घेतली जाईल, असं मला वाटत नाही, असे म्हटले.

अमित शाह यांना फटकारलं...

उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले नाहीत, याचा अर्थ काय घ्यायया. यावर शरद पवार म्हणाले, "फडणवीसांवर बोलले नाहीत, यावरून पुढचे संकेत काही मला दिसत नाहीत". पण अलीकडे अमित शाह सतत जे काही बोलतात, त्याची नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे. विरोधकांनी घेतली आहे. अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील, अशी अपेक्षा असते.पण अमित शाह यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही. खरं म्हटलं, तर अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार काही वाटत नाहीत. त्यामुळे अमित शाह कोल्हापुरात शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहिती नाही, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com