Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ नियमित आणि एक पोटनिवडणूक अशा १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा आहे, ही जागा ठाकरे लढवतील असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याचे संकेत दिले आहेत. पण उद्धव ठाकरेंनी याबाबत अद्याप कुठलंही भाष्य केललं नाही.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन याबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती"
विधानपरिषदेची एक रिक्त जागा हीच मुळात उद्धव ठाकरे निवृत्त झाल्यामुळं रिक्त झाली आहे. त्यामुळं या जागेवर शिवसेनेचाच हक्क आहे. पण सुप्रिया सुळेंच्या मागणीचा उद्धव ठाकरे सकारात्मक विचार करतात का हे पाहावं लागणार आहे? सुळे यांनी यामध्ये खासकरुन उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पाठिंबा दिला आहे, शिवसेनेतील इतर नेत्यांच्या नाही. तसंच दुसरीकडं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा आहेत, असं म्हणालेत पण उमेदवारीबाबत अद्याप आमची चर्चा झालेली नाही, असंही स्पष्ट केलं आहे. म्हणजेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. आता केवळ उद्धव ठाकरेंचंच नाव जाहीर होण्याची औपचारिकताच बाकी आहे.
विधानपरिषदेची निवडणूक येत्या १२ मे रोजी पार पडणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळ ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर काही वेळातच १२ मे रोजीच निकालही जाहीर होणार आहे.
या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ६, शिवसेनेच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ अशा महायुतीच्या वाट्याला एकूण ९ जागा आहेत. तर महाविकास आघाडीकडं एकमेव जागा आहे. हीच जागा उद्धव ठाकरे लढवणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.