Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News sarkarnama
मुंबई

सत्ता स्थापनेवेळी भाजपकडे असलेले दोन अपक्ष आता आघाडीत पण सात जणांनी ताणून धरलं!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. आघाडीसह भाजपची मदार असलेल्या एकूण 29 आमदारांपैकी 13 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामध्ये सरकार स्थापनेवेळी भाजपच्या गोटात असलेल्या दोन आमदारांचा समावेशही आहे. तर सात आमदारांनी बैठकीला दांडी मारून आघाडीचे टेन्शन वाढवलं आहे. (Mahavikas Aghadi Latest Marathi News)

सरकार स्थापनेवेळी आघाडीकडे 170 आमदारांचं संख्याबळ होतं. तर भाजपकडे आठ आमदारांसह 114 आमदार होते. या आठ जणांमध्ये गोंदियाचे विनोद अग्रवाल व मीरा-भाईंदर गीता जैन यांचाही समावेश होता. गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर अग्रवाल यांची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

आघाडीच्या बैठकीला अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या २९ पैकी १३ आमदारांची उपस्थिती आहे. त्यामध्ये जैन व अग्रवाल यांच्यासह आशिष जैस्वाल, किशोर जोरगेवर, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, राजेंद्र यड्रावकर आणि शंकरराव गडाख यांचा समावेश आहे.

तर सरकार स्थापनेवेळी आघाडीसोबत असलेल्या सात आमदारांनी टेन्शन वाढवलं आहे. सध्या राज्यमंत्री असलेले बच्चू कडू आणि त्यांच्या संघटनेचे आमदार राजकुमार पटोले यांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्याचप्रमाणे अबू आझमींसह समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनीही बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारही बैठकीत नाहीत. या सात आमदारांकडून अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर करण्यात आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT