तेच हॉटेल, तीच वेळ; महाविकास आघाडी भाजपला पुन्हा दाखवणार अस्मान?

महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi आमदारांची बैठक मुंबईमध्ये होत आहे
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे आघाडीच्या सत्ता स्थापनेवेळीही याच हॉटेलवर शक्तीप्रर्दशन करत भाजपला (BJP) अस्मान दाखवले होते. (Rajya Sabha Election Latest News)

विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणे शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळे शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे.

याच हॉटेलवर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मल्लिकार्जुन खर्गे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी तीनही पक्षांचे मंत्री व आमदार उपस्थित होत आहेत. या बैठकीला १२ अपक्ष आमदाराही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेवेळीही याच ट्रायडंट हॉटेलवर तीनही पक्षांची बैठक झाली होती. त्यामध्ये १७० आमदारांचा पाठिंबा आघाडीने मिळवला होता. त्यामुळे या बैठकीतही त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
थेट हॉटेल गाठत आमदार संजय शिंदेंनी केले पत्ते खुले! व्हिडीओ आला समोर

शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार निवडूण आण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे या बैठकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी शक्तीप्रर्दशन करणार आहे. दरम्यान या बैठकीआधी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय पवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आमच्याकडे संख्याबळ आहे. चार संजय जरी असते तरी ते विजयी झाले असते, असे राऊत म्हणाले होते.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
देशमुख अन् मलिकांच्या बाबतीत ईडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी गॅसवर!

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि सहयोगी आमदारांची बैठक सोमवारी सायंकाळी घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अपक्ष व सहयोगी आमदारांना भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com