Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : राहुल गांधीच्या जागेवरून शरद पवार बोलले, 'धोका टळला नाही...'

Mahavikas Aghadi Melava Sharad Pawar Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते पद हे संस्थात्मक पद महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्रिपदाची प्रतिष्ठाची देशाने ठेवली. विरोधी पक्षनेते पदाची प्रतिष्ठा तितकीच महत्वाची आहे, असे शरद पवार म्हणाले.

Roshan More

Sharad Pawar News : विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग महाविकास आघाडीने मुंबईतील मेळाव्यातून आज (शुक्रवारी) फुंकले. महाविकास आघाडीचे नेते विधानसभेत विजय निश्चित मिळेल. लोकसभेत चांगले यश मिळाले, असे सांगत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धोका टळला नसल्याचा इशारा दिला.

'निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं. याचा अर्थ संविधानावरचे संकट गेलं असा निष्कर्ष काढता येत नाही. संविधानप्रती त्यांना आस्था नाही. संविधानप्रती आस्था नसलेले सत्तेत आहेत.', असे शरद पवार म्हणाले.

संस्थात्मक पदं ही महत्त्वाची असतात. पंतप्रधान पद जसे महत्त्वाचे आहे तसे विरोधी पक्षनेते पद हे संस्थात्मक पद देखील महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्रिपदाची प्रतिष्ठाची देशाने ठेवली. विरोधी पक्षनेते पदाची प्रतिष्ठा तितकीच महत्वाची आहे, असे शरद पवार म्हणाले.

कालच्या 15 ऑगस्टला विरोधी पक्षनेते यांची बसण्याची व्यवस्था ही मागच्य रांगेत केली. मी स्वत: विरोधी पक्षनेता होता.अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. 15 ऑगस्टच्या सोहळ्याला विरोधी पक्षनेत्याची बसण्याची जागा कॅबिनेट मंत्र्यासोबत होती. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेता होत्या.15 ऑगस्ट कार्यक्रमात त्या कॅबिटन मंत्र्यांच्या लाईनमध्ये बसल्या होत्या.

व्यक्ती महत्त्वाचा नाही. ते संस्थात्मक पद महत्त्वाचे आहे. त्याचा सन्मान करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांची आहे. आणि त्यांच्याकडून खर्गे, राहुल गांधी यांची प्रतिष्ठा केली जाईल, ही अपेक्षा ठेवली गेली. मात्र, ती ठेवली गेली नाही. त्याचं महत्त्वाचं कारण लोकशाहीतील संस्था, त्यातील पदांवर यत्किंचित विश्वास नसलेले राज्यकर्ते देशाच्या सत्तास्थानी आहेत. त्यामुळे अतिशय जागृक राहण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.

परिवर्तनाचा विचार पेरा

महाराष्ट्राची संकटातून सुटका कशी करायची, याची दिशा आपल्याला निश्चित करायची आहे. देशा वरचे संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही.महाराष्ट्र विधानसभा दोन महिन्यात होईल. या कमी दिवसांत या तिन्ही पक्षांनी एका विचाराने सामान्य लोकांकडे जावून परिवर्तनाचा विचार त्यांच्या मनात रुजवला पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT