Sanjay Raut : "भगवा नाहीतर तिरंगा जिंकेल, पिंक जिंकणार नाही..."; गुलाबी रंगावरुन राऊतांनी अजितदादांना डिवचलं

Sanjay Raut On Ajit Pawar Mahaviakas Aghadi Melava : "सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या लाडक्या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला. पण या बहिणीच्या लाडक्या भावाने रंग बदलला, आता ते पिंक झाले आहेत."
Sanjay Raut On Ajit Pawar
Sanjay Raut On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 August : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजप आणि अजित पवारांवर जोरदार फटकेबाजी केली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुलाबी रंगावरुन टोला लगावला. लाडक्या भावाने आता सरड्याप्रमाणे रंग बदलला असून तो आता गुलाबी झाला आहे, पण राजकारणात गुलाबी रंग चालत नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना डिवचलं.

मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले, "सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या लाडक्या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला. पण या बहिणीच्या लाडक्या भावाने रंग बदलला, आता ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो पण तो असा अचानक पिंक कसा होऊ शकतो? आता हा सरडा बारामती पण सोडणार असल्याचं मी ऐकलं.

Sanjay Raut On Ajit Pawar
Video Jayant Patil: उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्री 'फाईल'वॉर वर जयंतरावांचा हल्लाबोल; अजितदादा न वाचताच सह्या करीत होते...

पण मी सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. शेजारच्या तेलंगणामध्ये केसीआरचा गुलाबी रंग पराभूत झाला. मी त्यांना एकदा बोललो हा रंग राजकारणात चालत नाही, इथे एकतर भगवा जिंकेल नाहीतर तिरंगा जिंकेल पण पिंक जिंकणार नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे तिरंग्याचं रक्षण भगवा करतो. आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, त्यामुळे पिंक गेला", असं म्हणत त्यांनी अजितदादांना (Ajit Pawar) टोला लगावला.

Sanjay Raut On Ajit Pawar
Video Ajit Pawar : "दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना!" हातात फ्लेक्स धरत भरसभेत तरुणाची अजितदादांना साद

मोदींच्या छातीतील उरलेली हवा काढू

यावेळी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मोदींची छाती 56 इंचाची आहे, हे ते स्वत: विसरले आहेत. त्यांना छातीच नाही, शिवाय त्यांच्या छातीतील उरलेली हवा आपण लोकसभेला काढली आहे. आणि आता राहिलेली विधानसभेत काढू."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com