Sharad Pawar, Uddhav Thackeray , Nana Patole Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aaghadi News: विरोधी पक्षनेतेपदासाठी 'मविआ' मोठा डाव टाकणार; शरद पवारांनी सुचवला 'हा' नवा फॉर्म्युला ?

Leader of the Opposition in Maharashtra VidhanSabha : राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी नागपुरात पार पडला. मुंबईत झालेले विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा निर्णय झाला नव्हता. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीकडून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, राज्यात सरकार स्थापन झालं असली तर अद्याप विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामीच आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) राज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळा प्रयोग करण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेता कोण होणार याची सगळीकडे चर्चा असतानाच तीन पक्षांसाठी दीड दीड वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची चर्चा आहे. दीड वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार (Sharad Pawar) आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी जरी दीड वर्षांच्या फॉर्मुल्यासाठी आग्रही असली तरी माहविकास आघाडीत या निर्णयावरुनही मतभेद आहेत.कॉग्रेस मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत कॉग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्षनेता असावा याकरता आग्रही आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीतून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान होणार आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळणार का..?

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 जागांचा आकडाही पार करता आला नाही. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंना 20 तर, शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाला एकूण संख्याबळाच्या 10 टक्के जागा असणं आवश्यक आहे.

288 पैकी विरोधी पक्षांमधील कोणत्याही एका पक्षाकडे कमीत कमी 29 आमदार असणं गरजेचं आहे. पण ,सध्या त्ताची महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे इतकं संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी नागपुरात पार पडला. मुंबईत झालेले विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा निर्णय झाला नव्हता. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीकडून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT