Supriya Sule : शरद पवार अन् अजित पवारांची 'सहमती एक्सप्रेस'? सुप्रियाताईंनी कोल्हापुरात दिलेली टाळी वाजणार...

NCP SharadChandra Pawar MP Supriya Sule DCM Ajit Pawar NCP Minister Hasan Mushrif Kolhapur : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ एकाच व्यासपीठावर होत्या. ही दोन्ही नेते शेजारी बसले असले, तरी एकमेकांशी भाष्य केले नाही.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून मात्र, आज या व्यासपीठावर मला माझे सहकारी भेटले. राजकारण होत राहील, पण रिश्ते टिकले पाहिजेत, असं विधान केले. सुप्रिया सुळे यांनी मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून केलेल्या या विधानानं राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या 'सहमतीची एक्सप्रेस' भविष्यात धावणार, अशी चर्चा रंगली आहे.

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन कोल्हापूर इथं झाले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, कुलगुरू डी. टी. शिर्के, युवराज आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार सुळे आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) शेजारी-शेजारी बसले होते. मात्र त्यांनी एकमेंकाशी चर्चा केली नाही. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.

Supriya Sule
Birth Certificate for Bangladesh Citizens : किरीट सोमय्या घुसखोरांच्या मागावर; मालेगावचे तहसीलदार निलंबित, तर आता मोर्चा यवतमाळकडे...

खासदार सुळे भाषणात मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून म्हणाल्या, "आज या व्यासपीठावर मला माझे जुने सहकारी भेटले. खूप बरं वाटलं. राजकारण होत राहील, पण रिश्ते टिकले पाहिजेत. ज्यांनी पवारसाहेबांच्या सोबत अनेक दशके काम केले, ती लोकं इथं आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचा वारसा मी कायम जपण्याचं काम करत राहील. नातं जपण्याचे काम माझ्याकडून होत राहील. राजकारण ही वेगळी गोष्ट आहे".

Supriya Sule
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे 'बिनडोक', तर आदित्य ठाकरे 'बालिश'; बावनकुळेंचे जशास तसे उत्तर

मंत्री मुश्रीफ कसा प्रतिसाद देणार

खासदार सुळेंनी मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीचे सहमती एक्सप्रेसचे राजकारण जोरात सुरू होणार असल्याचे संकेत आहेत, अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खासदार सुळेंनी वारंवार टीका केली होती. आता मात्र जुळवून घेण्याचे संकेत दिलं आहे. मंत्री मुश्रीफ भविष्यात, त्याला कसा प्रतिसाद देतात, याकडे आता नजरा लागल्या आहेत.

शरद पवारांच्या रिटायरमेंटवर भाष्य...

शरद पवार यांच्या रिटायरमेंटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी या दौऱ्यात पुन्हा भाष्य केले. कोल्हापुरात घर घ्यावं आणि कोल्हापुरातून रिटायर व्हावं, अशी वडिलांची इच्छा आहे. पण आमचे वडील राजकीय रिटायरमेंट घेतील, अशी लक्षणे दिसत नाहीत. मध्यंतरी रिटायर होतील, असं वाटत होते. पण घेतली नाही. त्यामुळे अनेकांची अडचण झाल्याचे, सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com