Ambadas Danve  Sarkarnama
मुंबई

Mahayuti Politics : भाजपची राजकीय खेळी; दोन कट्टर शिवसैनिक शिंदे-दानवेंना आणणार आमने-सामने?

Mahayuti BJP DCM Eknath Shinde Legislative Council House ShivSenaUBT Party Ambadas Danve : महायुती सरकारमध्ये प्रत्येक विभागात आपलं वर्चस्व राहील आणि विरोधकांमध्ये संघर्ष राहील, याची पुरेपर काळजी भाजप घेताना दिसत आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुती सरकारमध्ये प्रत्येक विभागात आपलं वर्चस्व राहील आणि विरोधकांमध्ये संघर्ष राहील, याची पुरेपर काळजी भाजप घेताना दिसत आहे. भाजपनं, अशीच ही राजकीय खेळी विधानपरिषदेत खेळली आहे. यामुळं दोन कट्टर शिवसैनिकांना आमने-सामने आणलं आहे.

भाजपने विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. भाजपचा या पदावर दावा आहे.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळाले आणि राज्यात महायुती सरकार स्थापन केले. नवनिर्वाचित आमदारांचा आज हंगामी अध्यक्षांनी शपथ दिली. सत्ताधारी सर्व आमदारांनी शपथ घेतली. मात्र मतदारांचा ईव्हीएम घोटाळ्यातून अवमान केल्याचा निषेध करत विरोधकांनी आज शपथ घेतली नाही. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी शपथ न घेऊन लोकशाहीचा अवमान केल्याची टीका केली. हे घमासान सुरू असतानाच महायुतीकडून (Mahayuti) विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अशी माहिती देण्यात आली. सत्तेचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे भाजपची मोठी राजकीय खेळी दिसते.

विधानपरिषदेचे सभापतीपद गेली दोन वर्षे रिक्त आहे. या पदावर भाजपचा (BJP) डोळा आहे. निवडणुकीपूर्वी हे पद भरलं जाईल, असं वाटत होते. परंतु तसं काही झालं नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. विधानसभेत देखील महायुतीचे महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याने सत्तेत प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व आणि विरोधकांची कोंडी, असं सूत्र ठेवलं आहे. राजकारणात तसं हे वावगं देखील नाही.

विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढं करत, भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. दानवे यांच्यासमोर एकनाथ शिंदेंना उभं केलं आहे. यामुळे विधानपरिषदेत दोन कट्टर शिवसैनिक आमने-सामने असतील.

अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सध्याच्या स्थितीमधील एकमेव आक्रमक नेते आहेत. पावसाळी अधिवेशनात भाजप नेते प्रसाद लाड यांच्याशी विधानपरिषदेत झालेला वाद सर्वश्रुत आहे. अंबादास दानवे यांनी आक्रमक होत, आपलं आसन सोडून थेट लाड यांच्या दिशेने धावले होते. यानंतर दानवे यांच्यावर दोन दिवसांची निलंबनाची कारवाई झाली होती. हाच आक्रमक चेहरा दाबण्यासाठी आता भाजपने एकनाथ शिंदेंना सभागृह नेतेपदाला पुढं केल्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे.

नियम काय सांगतो

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री हा दोन्ही सभागृहाचा नेता असतो. कामकाजाच्या सोयीसाठी हे पद नियमानुसार मंत्री महोदयाकडे जाऊ शकते. शिंदे हे मंत्री झाल्यावर सभागृहातील त्यांना कामकाजात सहभागी होता येईल. परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. प्रोटोकाॅलनुसार महायुती सरकारमध्ये एक नंबरला देवेंद्र फडणवीस आहेत. त्यानंतर दोन नंबरला एकनाथ शिंदे आणि तीन नंबरला अजित पवार आहेत. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे हे पद गेल्यास काही वावगं ठरत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT