Uddhav Thackeray, Ajit Pawar, Eknath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2025 : ठाकरेंची शिवभोजन थाळी अन् शिंदेंचा आनंदाचा शिधा बंद होणार? लाडकी बहीण योजनेचा खर्च भरून काढण्यासाठी सरकारच्या हालचाली

Shiv Bhojan Thali Scheme : सत्तेत येण्याआधी महायुती सरकारने लागू केलेल्या अनेक लोकप्रिय योजनांमुळे आता राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे आता मागील काही योजना बंद करता येऊ शकतात का? असा विचार सरकारमधील वरिष्ठांचा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Feb : सत्तेत येण्याआधी महायुती सरकारने (Mahayuti Govt) लागू केलेल्या अनेक लोकप्रिय योजनांमुळे आता राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे आता मागील काही योजना बंद करता येऊ शकतात का? असा विचार सरकारमधील वरिष्ठांचा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जवळपास एक लाख कोटी रुपयांची आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी आणि एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा यांसह आणखी काही योजना बंद करण्याच्या विचारात महायुती सरकार असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे एकट्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू ठेवण्यासाठी इतर योजना बंद करण्याची वेळ सरकारवर आल्याचं दिसत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढल्यामुळे आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विविध बैठकांमध्ये जुन्या काही योजना बंद करण्या संदर्भात चाचपणी केली जात आहे.

तर दुसरीकडे सरकारमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळी बंद करु नका, अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलं आहे. कारण शिवभोजन थाळी छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या राज्याच्या तिजोरीत दोन लाख कोटींहून अधिकची तूट आहे. त्यामुळं एक लाख कोटींची तूट भरुन काढली तर सरकारवरील भार कमी होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध बैठकांमध्ये शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यांच्यासह इतर काही योजना बंद करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. शिवभोजन थाळी या योजनेसाठी वर्षाला 263 कोटी रुपयांचा खर्च आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचं वाटप केलं जातं. या शिधात 100 रुपयात 4 वस्तू दिल्या जातात. मात्र, या वस्तूंची बाजारात किंमत 500 रुपये इतकी आहे. त्यामुळे उरलेले 400 रुपये राज्य सरकार भरते तो बोजा सरकारवर पडतो. त्यामुळे या दोन्ही योजना बंद करायच्या का? अशी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT