Shatrughan Sinha : 'देशात नॉन-व्हेजवर बंदी घाला', म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी समान नागरी कायद्याबाबत केलं मोठं वक्तव्य

Shatrughan Sinha On UCC : ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी समान नागरी कायद्याचं समर्थन करताना मांसाहाराबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Shatrughan Sinha
Shatrughan SinhaSarkarnama
Published on
Updated on

Shatrughan Sinha On UCC : ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी समान नागरी कायद्याचं समर्थन करताना मांसाहाराबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भारतात नॉनव्हेज जेवणावर बंदी घातली पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बॉलीवूड (Bollywood) अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे आपलं मत रोखठोक मांडत असतात. मात्र, यावेळी त्यांनी चक्क लोकांच्या आहाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

समान नागरी कायद्याचं (UCC) समर्थन करताना त्यांनी चक्क देशभरात मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. फक्त गोमांसच नाही तर देशभरात सर्व प्रकारच्या मांसाहारावर बंदी आणण्याची गरज आहे. भारतात नॉनव्हेज जेवणावर बंदी घातली पाहिजे, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे.

Shatrughan Sinha
Ganesh Naik : "ठाणे आपलंच जिथं पाहिजे तिथं"; संपर्कमंत्रिपदी नियुक्ती होताच शिंदेंसेनेचा विरोध असलेल्या 'जनता दरबार'बाबत गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य

तसंच त्यांनी उत्तराखंडमध्ये लागू केलेल्या समान नागरी कायद्याचं कौतुक केलं. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) यूसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. देशात समान नागरिक कायदा लागू केला पाहिजे आणि मला खात्री आहे की, सर्वजण माझ्य मताशी सहमत असतील.

Shatrughan Sinha
Sharad Pawar : पवारांच्या निवृत्तीच्या चर्चेने ‘कही खुशी कही गम’!

पण त्यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत. म्हणूनच यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे आणि या विषयावर प्रत्येकाचं मत जाणून घेतलं पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com