Beed Crime : एवढी मोठी डेअरिंग! आधी लाथाबुक्क्या, रॉडने तरुणाला मार मार मारलं, नंतर 'वाँटेड' आरोपी कृष्णा आंधळेचा ठेवला स्टेटस

Beed law and order problems : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडमध्ये पोलिसांना कुणी जुमानत नसल्याचं बोललं जात आहे. देशमुख यांच्या हत्येपासून बीडमधील गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.
Krishna Andhale
Krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 06 Feb : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या घटनेपासून बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडमध्ये पोलिसांना कुणी जुमानत नसल्याचं बोललं जात आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येपासून बीडमधील गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.

या सर्व घटनांमुळे बीडमधील (Beed) पोलिस प्रशासनाबाबत संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली उघडकीस आल्यामुळे बीडमधील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Krishna Andhale
Beed News : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात दाखल याचिका घेतली मागे, काय आहे कारण...

कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या का पाहतो? असा सवाल करत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या (Krishna Andhale) दोन मित्रांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आता पु्न्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमकं काय घडलं?

बीडच्या धारूर येथील अशोक मोहिते हा तरूण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. यावेळी फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी अशोक मोहितेला गंभीर मारहाण केली. शिवाय "मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या (Walmik Karad) बातम्या आणि व्हिडिओ बघितले तर तुझा पण संतोष देशमुख करु" अशी धमकीही दिली.

या मारहाणीत त्याला आठ टाके पडले आहेत. सुरूवातीला त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डोक्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे अशोक मोहितेला लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशोक मोहितेला मारहाण करून हे आरोपी फरार झाले आणि त्यानंतर या दोघांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त आंधळेचे फोटो स्टेटसला ठेवून त्याला शुभेच्छा दिल्या.

Krishna Andhale
Ganesh Naik : "ठाणे आपलंच जिथं पाहिजे तिथं"; संपर्कमंत्रिपदी नियुक्ती होताच शिंदेंसेनेचा विरोध असलेल्या 'जनता दरबार'बाबत गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य

'मिस यू भाई'

यावेळी त्यांनी 'हॅप्पी बर्थडे ब्रदर, 'मिस यू भाई' असं कॅप्शन स्टेटस ठेवताना लिहिलं होतं. त्यामुळे आता काल खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडमध्ये येऊन संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नसल्याचा सज्जड दम भरला होता. तरीही बीडमधील गुन्हेगारांवर काहीच फरक पडला नसल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com