Mumbai News : माहीम विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या मतदारसंघात हायहोल्टेज लढत पाहावयास मिळाली होती. याठीकाणी अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 'जायंट किलर' ठरले होते. निकालानंतर आता याठिकाणी माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या मतदार संघात मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी बाजी मारली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1 हजार 340 मतांनी पराभव केला.
हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सदा सरवणकर यांनी महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत महेश सावंत यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रार चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सदा सरवणकरांनी याचिकेतून केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञपत्रात दाखवणे आवश्यक मात्र जनतेची दिशाभुल करुन स्वता त्यावरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप महेश सावंत यांच्यावर याचिकेतून केला आहे. त्यामुळे माहीम विधानसभेत पुन्हा एकदा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. 28 फेब्रुवारीला होणार याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रीय आहेत. महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महेश सावंत हे सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचा पराभव करत आमदार झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.