
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तेवर आले. सुरुवातीपासूनच महायुतीमधील घटक पक्षात मंत्रिपद, खातेवाटप, पालकमंत्रिपद, बंगले या कारणावरून नाराजीनाट्य रंगले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत असते.
राज्य मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात न जाता ऑनलाईन उपस्थित राहणे, अशा घटनांमुळे शिंदे यांची नाराजी वाढत असल्याची चर्चा असतानाच बुधवारी नाशिकमध्ये 2027 साली होत असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली. पण या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून फिक्सर ओएसडी व पीएवरुन महयुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे.
प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याचा बुधवारी समारोप होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येत्या 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची तयारी राज्य सरकरकडून आतापासूनच केली जात आहे. या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी बुधवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास आणि अर्थ विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते. यासोबत रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रमुख नेते या बैठकीला गैरहजर होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील यापूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. पण आजच्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आतापर्यंतचा महायुती सरकार स्थापन होत असतानापासूनचा घटनाक्रम पहिला तर अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यामुळे या नाराजी नाट्यावरून चर्चा रंगली आहे. दुसरीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळेदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्यात आली असली तरी अद्याप या ठिकाणी पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
त्यासोबतच दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉर रूमची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या घडामोडींनंतर आता सह्याद्रीवर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून फिक्सर ओएसडी व पीएवरुन महयुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.