Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar Big Statement : सप्टेंबरमध्ये राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

Main Chair Will Be Change : सप्टेंबर महिना हा सत्ता बदलाचा आहे. मुख्य खुर्ची नक्की बदलेल, हे मी ठासून सांगतो.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आगामी सप्टेंबर महिना हा सत्ता बदलाचा असेल. येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात मोठे बदल होती. त्यामध्ये ‘मुख्य’ खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल, असे मी खात्रीने आणि ठासून सांगतो, असा खळबळजनक दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ('Main' chair in the state will change in September : Vijay Wadettiwar)

वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलेले जाणार अशी चर्चा रंगली होती. विशेषतः अधिवेशनाच्या काळात त्या चर्चेचा जोर होता. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहतील’, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी शांत झालेल्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आगामी १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात काय बदल होतील, ते राज्यातील जनता नक्कीच बघेल. त्यामध्ये ‘मुख्य’ खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल, असे मी खात्रीने सांगतो. सप्टेंबर महिना हा सत्ता बदलाचा आहे. सत्ताबदल म्हणजे आमची (महाविकास आघाडी) सत्ता येईल, असे आम्ही म्हणत नाही. पण, मुख्य खुर्ची मात्र नक्की बदलेल, हे मी ठासून सांगतो.

यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते असल्यामुळे विजय वडेट्टीवार यांना काहीतरी बोलावं लागतं, म्हणून ते बोलतात. राज्यात दोनशेच्या वर आमदारांचे बहुमत असलेले सरकार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असे आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलेले आहे. विरोधकांनी अशीच कितीही स्वप्नं बघितली तरी त्यांची स्वप्नं सत्यात उतरणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT