Farmers Surrounded Munde : धनंजय मुंडेंना शेतकऱ्यांनी घेरले; मुंडे म्हणाले ‘नीट बोला’, ‘तुम्ही आता आम्हाला धमकवणार का?’ शेतकऱ्याचा सवाल

Dhananjay Munde Yavatmal Tour : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तुम्ही आमच्या प्रश्नाला उत्तर देऊन जावा.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ठोस उपाय योजना करा, अशी मागणी करत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना येथील शेतकऱ्यांनी घेरले. त्या वेळी मुंडेंनी ‘आवाज....नीट बोला’ असे सांगताच शेतकरी मनीष जाधव यांनी ‘म्हणजे तुम्ही आता शेतकऱ्यांना धमकवणार का?’ असा सवाल केला. शेवटी यवतमाळच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री मुंडेंनी दिले. (Dhananjay Munde was surrounded by farmers)

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे आज (ता. १८ ऑगस्ट) यवतमाळमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांनी मंत्री मुंडे यांना घेरले. या वेळी शेतकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या. त्यामुळे थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मुंडेंच्या संयमी भूमिकेनंतर तणाव निवळला.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तुम्ही आमच्या प्रश्नाला उत्तर देऊन जावा, अशी मागणी शेतकरी मनीष जाधव यांनी केली. त्यावेळी मुंडेंनी ‘आवाज… तुम्ही नीट बोला’ असे त्यांना सांगितले. त्यावर ‘तुम्ही आता यवतमाळ जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना धमकवणार का?’ असा उलट प्रश्न शेतकऱ्याने केला. इथं दररोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. चिबाड जमिनीचा आमचा प्रश्न आहे.

Dhananjay Munde
Munde First Reaction on pawar Sabha : पवारांच्या बीडमधील सभेनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘भक्ताच्या मनातील देव काही...’

धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही शेतकरी आहात, मीही शेतकरी आहे. तुम्ही जरा हळू आवाजात बोललात तर बरं होईल. त्यावर शेतकरी जाधव म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत १७ आत्महत्या आहेत. यवतमाळला विशेष दर्जा देऊन ठोस उपाय योजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

Dhananjay Munde
Beed Politics : शरद पवारांवरील निष्ठेपायी संदीप क्षीरसागरांनी तिसऱ्यांदा सोडली सत्तेची संधी....

यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारण राबविणे शक्य नाही. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत जलसंधारणासाठी एक चौरस फूटही जागा नाही. आपल्याला जमिनीतून पाणी निचरा होण्याची यंत्रणा राबवावी लागणार आहे. जोपर्यंत या समस्येवर उपाय निघणार नाही, तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही, अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली.

Dhananjay Munde
Girish Mahajan Statement : सर्वच पक्षांचे बारा वाजलेत, आता आपण काहीही करू शकतो; गिरीश महाजनांचे वक्तव्य

आपण सांगितलेल्या प्रश्नावर मुंबईत पुढच्या आठवड्यात बैठक बोलवतो. तुम्हालही त्या बैठकीला बोलावतो, असे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com