Jayant Patil attacked dcm Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Video Jayant Patil: उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्री 'फाईल'वॉर वर जयंतरावांचा हल्लाबोल; अजितदादा न वाचताच सह्या करीत होते...

Maha Vikas Aghadi Mumbai Melava Jayant Patil on Ajit Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 'फाईल 'वॉर सुरू आहे. हिशेब न करता सह्या केल्यामुळे आतापर्यंतच्या घोषणा झाल्या आहेत, असा टोला जयंतरावांनी अजितदादांना लगावला.

Mangesh Mahale

महायुतीमध्ये धुसफूस सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्त्वाच्या फाईल्सवर सह्या करण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 'फाईल 'वॉर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेल्या 'फाईल'वर अजितदादांनी सही करण्यास नकार दिला आहे, याचा अर्थ यापूर्वीच्या अजितदादा हे न वाचता सह्या करीत होते. हिशेब न करता सह्या केल्यामुळे आतापर्यंतच्या घोषणा झाल्या आहेत, असा टोला जयंतरावांनी अजितदादांना लगावला.

महाविकास आघाडीचा निर्धार मेळाव्यात जयंतराव बोलत होते. मेळाव्याचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाकरे यांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मविआच्या कोणत्याही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईतील मविआच्या मेळाव्याला उशिरा हजर झाले. त्यांना पाहून ठाकरेंनी अप्रत्यक्ष टोला लगावत विधानसभेत जागेवरून मारामारी नको, असे म्हटले आहे.

"नाना पटोले तुम्ही नव्हता तेव्हा मी सांगितले की, काँग्रेसने, राष्ट्रवादीने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे. फक्त जागेवरून मारामारी करू नका. एखादी जागा ही काँग्रेसकडे गेली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचे नाही, असे करून चालणार नाही. शिवसेनेकडे एखादी जागा आली तर काँग्रेस, राष्ट्रवादीने काम करायचे नाही, असे करायचे नाही. राष्ट्रवादीकडे जागा गेली तरी सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे. एकजूट किंवा वज्रमूठ हे केवळ शब्दात असता कामा नये तर वज्रमूठ ही कामातून दिसली पाहिजे,"

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हं कोणाचं, याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यावर उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर विश्वास आहे, असे सांगून खटल्याला होत असलेल्या दिरंगाईबाबत न्यायव्यवस्थेला चिमटे काढले. शिवसेना, राष्टवादी पक्ष कोणाचे याबाबत दाखल याचिकेवर 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी आम्हाला न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT