CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Video : 'मला काही सांगायचंय' CM शिंदेंवर आधारीत नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Drama based on CM Eknath Shinde : या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळींचा उलगडा केला जाणार आहे. त्यामुळे या नाटकातून एकनाथ शिंदे काय नेमक सांगणार? याबाबतची उत्सुकता लागली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 18 Sep : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडी आता रंगमंचावर येणार आहेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आधारित 'मला काही सांगायचंय' या नावाचं एकपात्री नाटक लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळींचा उलगडा केला जाणार आहे. त्यामुळे या नाटकातून एकनाथ शिंदे काय नेमक सांगणार आहेत. याबाबतची उत्सुकता लागली आहे.

या नाटकाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ असणार आहे. तर या नाटकाची अधिकृत घोषणा दोन दिवसात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर हे नाटक सध्या 'सेन्सॉर बोर्डा'कडे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभेच्या (Assembly Election) तोंडावर हे नाटक शिंदेंची राजकीय खेळी नेमकी कशी दाखवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना (Shivsena) आमदारांसह भाजपसोबत युती केली. मात्र, या आमदारांना गुहावाटी येथे घेऊन जाणं त्यानंतर त्यांना मुंबईत घेऊन येणं ही सर्व घडामोड अनपेक्षित आणि तेवढीच नाट्यमय होती. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा उलगडा नाटकात केला होणार का? याचीही उत्सुकता आहे.

धर्मवीर

दरम्यान, याआधीही शिंदेंच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली हे दाखवणारा 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट आणि एकनाथ शिंदे यांची राजकारणातील एन्ट्री दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली असून तो देखील या महिन्यात 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT