Mallikarjun Kharge Sarkarnama
मुंबई

Congress MLA Cross Voting : 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या 'या' पाच आमदारांवर कुऱ्हाड पडणारच; खर्गेंचे आदेश

Akshay Sabale

Congress Political News : विधान परिषदेच्या निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या 5 आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यात मराठवाड्यातील 3, विदर्भ आणि मुंबईतील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 2 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरदचंद्र पवार पक्ष) पुरस्कृत केलेले शेकापचे, नेते जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या आमदारांबाबत 'कडक' पाऊल उचलण्याची मागणी होत होती. 2019 च्या राज्यसभा निवडणुकीवेळीही काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केलं होतं. पण, त्यावेळी 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या आमदारांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग' करण्याचं धाडस आमदारांनी केल्याचं बोललं जात होतं.

त्यामुळे 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या आमदारांची नावे प्रदेश काँग्रेसनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातच आता आमदारांवर 'कडक' कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिले आहेत.

झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे या आमदारांवर 'क्रॉस व्होटिंग' प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच, दोन आमदारांबाबत पुन्हा चौकशी करून निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT