Uddhav Thackeray, Manisha Kayande Sarkarnama
मुंबई

Manisha Kayande On Thackeray Group: मनिषा कायंदेंचा ठाकरे गटावर निशाणा; म्हणाल्या, "पक्षात घुसमट..."

Uddhav Thackeray Shivsena : महाविकास आघाडीत मन मारून काम करण्याची वेळ

सरकारनामा ब्यूरो

Manisha Kayande On Thackeray's Shivsena : ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी (ता. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून पक्षाच्या प्रवक्तेपदावरून मनिषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र शिंदे गटाने पक्ष प्रवेशानंतर लगेचच मनिषा कायंदे यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, कायंदे यांनी सोमवारी (ता. १९) ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

मनिषा कायंदे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपण ठाकरे गट सोडल्याची काही कारणे स्पष्ट केली. तसेच विधान परिषदेचे सदस्य केल्यामुळे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. यावेळी कायंदे यांनी ठाकरे गटात आपली वैचारिक घुसमट होत होती. तेथे मनमोकळेपणाने काम करता येत नव्हते. याची प्रखर जाणी झाल्यानेच आपण ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कायंदे यांनी यावेळी सांगितले.

मनिषा कायंदे म्हणाल्या, "मी भाजपमध्ये तळागाळापासून २५ वर्षे काम केले. मात्र माझे पहिले आकर्षण हे शिवसेनाच होती. मी पहिले मतदान शिवसेनेलाच केले आहे. भाजपची आणि तत्कालीन शिवसेनेची वैचारिक भूमिका सारखी होती. त्यामुळे भाजपमधून शिवसेनेत येऊनही काम करताना जास्त फरक जाणवला नाही. शिवसेनेत ठाकरे यांनी मला विधान परिषदेचे सदस्य केले. मात्र पक्षांतर्गत जाबाबदारी दिली जात नव्हती. याची खंत होती."

महाविकास आघाडीत काम करताना वैचारिक घुसमट होत असल्याची कबुलीच यावेळी कायंदे यांनी दिली. त्या म्हणाल्या, "राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे विभिन्न विचाराचे पक्ष एकत्र आल्याने काम करताना अडचणी येत होत्या. महाविकास आघाडीतील विचारधारा विभिन्न आहेत. इच्छा नसतानाही पक्षप्रमुखांचे आदेश मान्य करत होते. मात्र आता पाणी डोक्यावरून जायला लागले. स्वातंत्र्यवीर सावकर व इतर अनेक मुद्द्यांवरून ठाकरे शिवसेनेला बाजू मांडले जड जाऊ लागले. यातून हिंदुत्वाच्या विचारधारेपासून आपण दिवसेंदिवस दूर जात असल्याची जाणीव झाली."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT