Fake Major of Indian Army Arrest in Pune : भारतीय सैन्यात अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या व लष्कर परिसरात वावरणाऱ्या एका तोतया मेजरला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील लष्कराच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकारामुळे लष्करी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. सध्या तो चिखलीतील सोनवणेवस्ती येथे राहत असून मूळचा कुपटगिरी (ता.खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) येथील आहे. त्याने लष्करात अधिकारी असल्याचे भासवून लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याकडून दोन गणवेश खरेदी केले. त्यातून त्याने आर्थिक फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकातील अमोल पिलाणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहितीनुसार, सुरक्षा रक्षक असलेल्या प्रशांत पाटीलने हा २०१९ पासून आपण भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवत आहे. त्याने खडकी येथील दुकानदार असेलेले व निवृत्त सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य त्याने खरेदी केले. त्या साहित्याचे चार हजार ७०० रुपये नंतर देतो असे त्याने सांगितले. मात्र ते पैसे त्याने न देता मोरे यांची फसवणू केली.
दरम्यान, प्रशांत पाटील याने सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करून सदनकमांडमध्ये कार्यरत असल्याचे भासवले. सैन्य दलाच्या गणवेशात फोटो लावून बनावट ओळखपत्र तयार केले. त्या ओळखपत्राचा वापर करून तो सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन पुणे या सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात अधिकारी असल्याचे सांगत होता. तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयाचे पत्त्याचा वापर करून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड काढून फसवणूक केल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. त्याच्याविरोधात भा.दं.वि. १७०, १७१, ४२०, ४६५, ४६८, ४७५ या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.