Praful Patel, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Praful Patel: प्रफुल पटेलांचे मुख्यमंत्री शिंदेंबाबत मोठं विधान; मलिकांच्या उमेदवारीवरून वाद पेटणार?

Mankhurd Shivajinagar Constituency: मानखूर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून ठाम भूमिका मांडली जात आहे.

Rajanand More

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखूर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप व शिवसेनेने त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. प्रफुल पटेल यांनी तर यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे.

मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. तर याच मतदारसंघात शिवसेनेचाही उमेदवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मलिकांच्य पाठिशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतच जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

पटेल यांनी मीडियाशी बोलताना नवाब मलिक हे आमचे नेहमीच सहकारी राहिले असल्याचे सांगत त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असे स्पष्ट केले. आरोप सिद्ध झाल्यावर किंवा निकाल लागल्यानंतरच याचा विचार करायला हवा, असे म्हणत त्यांनी मलिकांची पाठराखण केली आहे.

प्रत्येक पक्षात असे लोक आहेत ज्यांच्यावर काही ना काही कारवाई झाली आहे, त्यापैकी काही मुख्यमंत्री आहेत. अगदी सध्याचे मुख्यमंत्री, असे म्हणत पटेलांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. त्यामुळे आता या विधानावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.

मलिक हे आमचे जुने सहकारी असल्याने आम्ही त्यांना तिकीट दिले आहे. कुणाला अन्य काही वाटत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असे स्पष्ट करून पटेलांनी मलिकांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT