Kolhapur News, 05 Nov : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Kolhapur North Assembly Constituency) काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले आहेत.
शिवाय या घटनेमुळे सतेज पाटील आणि शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) छत्रपतींमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. तर विरोधकांनी देखील ज्या महाराजांच्या नावाने सतेज पाटलांनी लोकसभेला मतं मागितली त्याच महाराजांना ते अर्वाच्य भाषेत बोलत असल्याची टीका केली.
दरम्यान, आता या सर्व प्रकणावर सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय शाहू महाराजांबद्दल आपणाला प्रचंड आदर असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, कालच्या विषयावर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडलं त्यावर बोलणार नाही. पुढं कसं जायचं यावर चर्चा सुरू आहे. परवा आमचं ठरलं होतं त्यानुसार आज इंडिया आघाडीची बैठक घेतली. लोकसभेला इंडिया आघाडी म्हणून सगळे राबले होते. तसेच ते आता विधानसभेला काम करतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
घडलेल्या गोष्टी सगळ्यांसमोर आहेत. पुढील दिशा सगळ्यांना विश्वास घेऊन कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघातील भूमिका रात्रीपर्यंत स्पष्ट करू. शाहू महाराजांशी काल गारगोटीतून येताना चर्चा केली असून त्यांना विश्वासात घेऊन जो निर्णय होईल तो आम्ही घेऊ.
मात्र आता या विषयावरून मी कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. मला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदरच आहे. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका राहिली आहे आणि पुढे सुद्धा ती तशीच राहणार असल्याचं पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.